Wednesday, July 3, 2024

शर्लिन चोप्राचे कडवट शब्द ऐकून पुन्हा भडकली राखी सावंत; म्हणाली, ‘तुझ्याकडे वरपासून खालपर्यंत…’

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘मधील साजिद खान याच्या एन्ट्रीचा वाद दिवसंदिवस अधिकच वाढत चाला आहे. शर्लिन हिने साजिद खान विरोधात तक्रार दाखल करून पोलिसांसमोर तिचे बयाण नोंदवले आणि त्यानंतर राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. राखी सावंतने सर्वप्रथम शर्लिनवर आरोप केले. यानंतर शर्लिन राखीबद्दल असे काही बाेलली ज्यामुळे राखी चांगलीच संतापली. आता राखी सावंतने शर्लिन चोप्राला प्रत्युत्तर दिले असून, तिचे हे वक्तव्य भन्नाट व्हायरल होत आहे.

मीडियाशी बोलताना राखी सावंत (rakhi sawant) हिने शर्लिन चोप्रा (sherlyn chopra) हिच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शर्लिनचे हे वक्तव्य ऐकून राखी इतकी भडकली की मीडियाशी बोलताना ती म्हणाली, “मी अद्याप शर्लिनविरुद्ध मारहानीचा खटला दाखल केलेला नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, मी लठ्ठ आहे, तर स्वतःकडे पहा मृत हाडांची रचना आहे. डॉक्टरांनी लापो सेक्शन करून लॅपो केले आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

यासोबतच राखी सावंत म्हणाली की, “तू वरपासून खालपर्यंत शस्त्रक्रिया केली आहेस.” राखी सावंतचे हे विधान शर्लिन चोप्राच्या त्या विधानावर प्रतिवाद आहे ज्यात शर्लिन म्हणाली होती, “31 किलो मेकअप करा, दर चौथ्या महिन्यात बॉयफ्रेंड आणि नवरा बदला, टक्कल लपवण्यासाठी विग घाला.. आम्ही कधी विचारले? तिला लाज वाटायला पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंत नेहमीच साजिद खान निर्दोष असल्याचे सांगत असते. तिने या आधीही मीडियासमोर ओरडून साजिदला निर्दोष आणि शर्लिनला दोषी ठरवलं होतं. ती म्हणाली की, “साजिदला खोटे बोलून गोवले जात आहे आणि त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत.” मात्र, MeToo चळवळीदरम्यान साजिदवर जवळपास 9-10 मुलींचे शोषण केल्याचा आरोप केला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘कोण म्हणतं अदा प्राणी प्रेमी नाही?’ पाहा अभिनेत्रीचा भन्नाट व्हिडिओ

विकी काैशल घेताेय मसाजचा आनंद, पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा