Saturday, June 22, 2024

शर्लिन चोप्राने केली साजिद खानविरोधात तक्रार, ‘बिग बॉस 16’ मधून काढण्याची विनंती

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बाॅस 16‘मध्ये साजिद खान याच्या प्रवेशामुळे गायिका सोना महापात्रा आणि अभिनेता अली फजल यांनी अलिकडेच साजिद संबंधी प्रतिक्रिया दिली असून त्याला टीव्ही शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. MeToo चळवळीदरम्यान साजिदवर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्यामुळे त्याला पुन्हा सार्वजनिक व्यासपीठावर येण्याची संधी देऊ नये, अशी सर्वांची मागणी आहे. अशातच शर्लिन चोप्रा हिने आज मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात चित्रपट निर्माता साजिद खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. 2005 साली तिचा विनयभंग झाल्याची वेदनादायक घटना समोर आणण्यासाठी या अभिनेत्रीने हे कृत्य केले आहे.

शर्लिनच्या प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की, “आम्ही काेणते कलम लावून गुन्हा दाखल केला त्याचा खुलासा करु इच्छित नाही, परंतु आम्ही एका महिलेच्या प्रतिष्ठेला अपमानित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. त्याची प्रतिमा साफ करण्यासाठी तो बिग बॉस शोमध्ये कसा आला हे देखील आम्ही सांगितले आहे.” शर्लिन चोप्राने पोलीस उपायुक्तांकडे तसेच राष्ट्रीय महिला आयोगाकडे मार्किंगची तक्रार केली आहे.

अभिनेत्रीचे वकील सोहेल शरीफ यांनी या घटनेबद्दल सांगितले की, “आज शर्लिनने साजिद खानविरुद्ध कलम 354 अंतर्गत जुहू पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.” शर्लिनच्या अटींपैकी एक म्हणजे साजिदला ‘बिग बॉस’च्या शोमधून निलंबित करण्यात यावे. तिने याआधीच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहित विंनती केली आहे की, “एक-दोन दिवसात कलर्स टीव्हीने बिग बॉसच्या त्या भाग प्रसारण करणे बंद करावे ज्यात साजित खान आहे.”

बिग बॉस शोमध्ये साजिद खानच्या प्रवेशावर फिल्म इंडस्ट्रीतील महिलेने आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्तानेही शोच्या नव्या सीझनमध्ये साजिदच्या कास्टिंगवर आक्षेप घेतला होता. तनुश्री ही भारतात MeToo चळवळ सुरू करणाऱ्या पहिल्या महिलांपैकी एक मानली जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी कपूरने बहिणीला दिला मोलाचा सल्ला; म्हणाली, कोणत्याच अभिनेत्याला करु नको …

धमाका! खेसारी लाल यादवच्या ‘छठ घाटे चली’ गाण्यानं घातली धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा