Monday, July 1, 2024

बॉयफ्रेंडसाठी राखीनं ठेवला करवा चौथ, त्याच्यासाेबत विमानतळावर झाली स्पॉट, व्हिडिओनं वेधलं लक्ष

आज सर्व महिलांनी करवा चौथचा उपवास ठेऊन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचे विलक्षण दिसणारे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंतनेही तिचा प्रियकर आदिल दुर्रानीच्या नावाने मेहंदी लावली असून त्याच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास ठेवला आहे.

राखी सावंतने (Rakhi Sawant) तिच्या स्टाईलने आणि विनोदाने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. राखी अनेकदा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. मग आज करवा चाैथ असताना राखी चर्चेत कशी नाही राहणार. राखी नुकतीच बॉयफ्रेंड आदिलसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. यादरम्यान राखीने पॅपराजींनसमाेर प्रियकर आदिलच्या नावाची मेहंदीही दाखवली. राखीच्या मेहंदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली.पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये राखी खूपच सुंदर दिसत होती. राखीच्या पांढऱ्या सूटवर गोल्डन कलरची बॉर्डर आहे, ज्यामुळे राखीचा लूक आणखी चांगला दिसत होता. यासोबतच अभिनेत्रीने आपले केस खुले ठेवले होते. जे पाहून राखीचे चाहते घायाळ झाले.

राखी सावंतने पॅपराजींनसमाेर आदिल दुर्रानीसोबत अनेक रोमँटिक पोज दिल्या. फोटोमध्ये ती आदिलला मिठी मारताना देखील दिसत आहे. राखीच्या चाहत्यांना तिचा करवा चौथचा लूक खूप आवडला आहे. राखी सावंतने तिचे हे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत राखीने कॅप्शनमध्ये लिहिले, ”करवा चौथ राखी सावंतचा लूक.”

 

View this post on Instagram

 

A post shared by TellyMasala (@tellymasala) 

विशेष म्हणजे राखी सावंत अनेक दिवसांपासून बिझनेसमन आदिल दुर्रानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. राखी आणि आदिल अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अनेकदा दोघेही जिमच्या बाहेर पॅपराजींना पोज देताना दिसतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
काय सांगता! साराचं अन् शुबमनचं अफेअर? फ्लाईटमधला व्हिडिओ व्हायरल
जे बात! खेसारीचं हिंदी गाणं व्हायरल, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा