Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड काय सांगता! साराचं अन् शुबमनचं अफेअर? फ्लाईटमधला व्हिडिओ व्हायरल

काय सांगता! साराचं अन् शुबमनचं अफेअर? फ्लाईटमधला व्हिडिओ व्हायरल

बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री सारा अली खान हिने आपल्या दमदार अभिनयाने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सारा आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. तिचे मनमोहक फोटो नेटकऱ्यांना नेहमीच भुरळ घालते  पण सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे सारा चर्चेत आली आहे. सारा अली खान आणि शुभमन गिल एका फ्लाइटमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्यांनी पुन्हा एकदा पेट घेतला आहे.

सारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलला करत आहे डेट 
अभिनेत्री सारा अली खान( sara ali khan ) क्रिकेटर शुभमन गिल (shubman gill) याला डेट करत आहे. अशा अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघे पहिल्यांदा एका रेस्टॉरंटमध्ये साेबत डिनर करताना दिसले होते. अशातच आता दोघेही विमानात एकत्र प्रवास करताना दिसले आहेत.

शुभमन गिल आणि सारा अली खान एकमेकांच्या बसले शेजारी
इंटरनेटवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये शुभमन गिल आणि सारा अली खान एकमेकांच्या शेजारी बसले आहेत. विशेष म्हणजे सारा अली खानचे आजोबा देखील क्रिकेटर होते. चाहत्यांना वाटते की, सारा अली खान आता शुभमन गिलची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेली असेल. सारा अली खान शुभमन गिलच्या नात्याबाबत सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत आहेत.

सारा अली खानच्या आधी सारा तेंडुलकर शुभमनला करायची डेट
सारा अली खानच्या आधी शुभमन गिलला सारा तेंडुलकरल डेट करत होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या. दोघांनी कधीही त्यांच्या अफेअरची अधिकृत माहिती दिली नाही. सारा अली खानचे यापूर्वी कार्तिक आर्यनसोबत अफेअर होते. कार्तिक आर्यन हा तिचा क्रश असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, नंतर दोघे वेगळे झाले. सारा अली खान अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
साजिद खानच्या एन्ट्रीमुळे बिग बॉसचं वाटोळ! तनुश्री दत्ता म्हणाली, मी तर कधीच..
एकटेपणा आणि अश्रू गाळण्यातच गेला मधुबाला यांचा अंतिम काळ, किशोर कुमार यांच्याकडे नव्हता त्यांच्यासाठी वेळ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा