Monday, October 27, 2025
Home अन्य चार वर्षात तुटलं राखी सावंतच्या एक्स बाॅयफ्रेंडच लग्न; कारण आहे खूपच भयान

चार वर्षात तुटलं राखी सावंतच्या एक्स बाॅयफ्रेंडच लग्न; कारण आहे खूपच भयान

अभिनेत्री राखी सावंत तिच्या बोल्ड स्टाइल आणि स्पष्टवक्ते वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखीच्या मुलाखती खूपच धक्कादायक आणि मनोरंजक आहेत. मात्र, सध्या ती तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. राखी सावंत काही दिवसांपासून बिझनेसमन आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट केले जातात आणि मीडियाशी संवादही साधतात. 

परंतु आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani ) हा पहिला व्यक्ती नाही, ज्याला राखी सावंत (Rakhi Sawant) डेट करत आहे. याआधी राखीने दीपक कलाल (Deepak Kalal) पासून ते अभिषेक अवस्थी(Abhishek Awasthi) याच्यापर्यंत डेट केले आहे. मात्र, तिचे नातं कुणासाेबत फार काळ टिकलं नाही. यादरम्यान, अभिषेकला घेऊन नवीन अपडेट आलं आहे.

अभिषेक राखीसाेबत डान्स रियालिटी शाे ‘नच बलिए 3’ मध्ये दिसला हाेता. मात्र, या शाेनंतर ते वेगळे झाले आणि अभिषेक अवस्थीने 2018 मध्ये अंकिता गोस्वामीसाेबत लग्न केलं. मात्र, त्या दाेघांचे लग्न आता तुटण्याच्या मार्गावर आहे. नुकतच यावर अभिनेत्यानं एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिषेक अवस्थी आणि अंकिता लवकरच विभक्त हाेणार आहे. दाेघे लवकरच घटस्फाेटासाठी अर्ज दाखल करणार आहे. अशातच अभिषेक अवस्थीने एक मुलाखत दिली आहे. ताे म्हणाला, “डान्स स्टूडिओ बंद झाल्यानंतर माझं आयुष्य एकदमच पालटून गेलं. इतकंच नाहीतर माझं लग्न गैरसमजामुळे तुटण्याच्या मार्गावर आहे. आम्ही दाेघांनी लग्नाला वाचवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. मात्र, असे हाेऊ शकले नाही.”

अंकिता गोस्वामीच्या पहिले अभिषेक अवस्थीनं कल्पना सोनावणे अन् राखी सावंत हिला डेट केलं हाेतं. मात्र, राखीनं सर्वांसमाेर अभिषेकला चापट मारली. या विवादानंतर दाेघांचे मार्ग वेगळे झाले. राखी सध्या आदिल दुर्राणीला डेट करत आहे. आदिल आणि राखी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. दोघांचा रोमान्स सर्वांसमोर आहे आणि नुकतेच दोघेही म्हैसूरला गेले होते, जिथे दोघेही बग्गीवर बसून रात्री उशीरापर्यंत एन्जॉय करताना दिसले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन, जगभरातील चाहते शोकसागरात
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन, जगभरातील चाहते शोकसागरात

हे देखील वाचा