Monday, June 17, 2024

प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, पुण्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास, कलाविश्वावर शोककळा

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. तब्येत खालावल्याने त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची वार्ता आहे. काही दिवसंपूर्वीच माहिती समोर आली होती की त्यांनी डोळे उघडले आहेत. मात्र, नुकतंच बातमी समोर येत आहे, शनिवार (दि, 26,नोव्हेंबर) रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे.  विक्रम गोखले यांच्या जाण्याने कलाक्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दिग्गज अभिनेत्याला अनेक क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

अभिनेता विक्रम गोखले (दि, 25 नोव्हेंबर) रोजी यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याचे सांगितले होते, मात्र त्यांच्या शरीराला कोणत्याच प्रकारच्या औषधांचा उपचार सकारात्मक होत नव्हते. शेवटी त्यांनी शनिवार (दि, 26 नोव्हेंबर) रोजी त्यांनी पुण्याच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

विक्रम गोखले (vikram gokhale) यांनी टीव्ही सीरियल, बॉलिवूड, मराठी सिमेमांना अनेका भूमिका गाजवल्या आहेत. व्यासंगी अभिनेते म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. प्रत्येक चित्रटात त्यांनी मिळेल त्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मात्र, घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनयातून संन्यास घेतला होता.

विक्रम गोखले यांना 2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.(veteran actor vikram gokhale passed away)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रिचा चड्ढाच्या ट्वीटने पेटला वाद, काही कलाकारांनी लावली फटकार तर ‘या’ अभिनेत्याने दिली साथ
‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार!’, दिग्गज अभिनेता प्रशांत दामलेंनी शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा