Sunday, June 8, 2025
Home कॅलेंडर रकुल प्रीत सिंगने वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण बॉयफ्रेंड जॅकी भगनानीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

रकुल प्रीत सिंगने वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण बॉयफ्रेंड जॅकी भगनानीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने (Rakul Preet Singh) हिंदी चित्रपटांसोबतच तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. रकुलने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनयासोबतच रकुल तिच्या परफेक्ट स्टाईलसाठीही ओळखली जाते. नुकतेच तिचे वडील कुलविंदर सिंग यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांना तिचे “रोल मॉडेल” म्हटले आहे.

रकुल प्रीतने तिचे वडील आणि आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि तिच्या वडिलांसाठी हृदयस्पर्शी शब्द लिहिले आहेत. या पोस्टवर अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, मात्र दोघांनी त्यांचे नाते खासगी ठेवले आहे.

रकुल प्रीतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या वडिलांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये अभिनेत्री आई आणि वडील दोघांसोबत आहे. तिचे हे फोटो सुट्टीतील वाटतात. तिचे कौटुंबिक फोटो शेअर करत रकुलने लिहिले की, “माझी प्रेरणा, माझ्या आदर्शाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही एक निर्भय बलवान व्यक्ती आहात, त्या सर्व ज्ञानासाठी आणि शहाणपणासाठी मी दररोज तुमच्याकडे पाहते. मी सर्वात भाग्यवान आहे की, तुम्ही मला नेहमीच प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन केले. आई लव यू टू मून एंड बैक माय पॉप्स. आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष जावो आणि मी तुम्हाला नेहमीच अभिमान वाटेल असे करण्याचे वचन देते.”

जॅकी भगनानीने लिहिली ‘ही’ गोष्ट
रकुल प्रीतच्या या पोस्टवर तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने रकुलच्या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले की, “वाह मला आता कळाले की, तुला शिस्त कुठे मिळते.” रकुलने त्याच्या कमेंटला जीभ बाहेर काढून इमोजीद्वारे उत्तर दिले. हे फोटो पाहिल्यानंतर एका चाहत्याने लिहिले की, “आता लवकरच मी जॅकी सरांना तुमच्यासोबत फॅमिली फोटोंमध्ये पाहणार आहे.” या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, इतर अनेक सेलिब्रिटींनीही रकुल प्रीतच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जॅकी आणि रकुल नुकतेच आग्रा येथील ताजमहालला एकत्र जाताना दिसले होते आणि नंतर रकुलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर आग्रा शूटिंगमधील फोटो शेअर केले होते. या जोडप्याने गेल्या वर्षी रकुलच्या ३१ व्या वाढदिवशी, जॅकीने तिचा हात धरलेला एक फोटो शेअर केला होता.  या पोस्टद्वारे दोघांनीही आपले नाते अधिकृत केले आहे.

हेही वाचा – 

 

हे देखील वाचा