‘लायगर‘ हा सिनेमा 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘बाहुबली‘ फेम राम्या कृष्णन ही विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे अभिनित ‘लायगर’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी घट झाली आहे. अशात राम्याने केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ माजली आहे.
अभिनेत्री राम्या कृष्णन (Ramya Krishnan) हिने बॉलिवूडबद्दल वक्तव्य केले. ती म्हणाली की, बॉलिवूडमध्ये तिने खूप कमी काळासाठी काम केले. त्यानंतर तिला साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळणे योग्य वाटले. राम्याने तिच्या कारकीर्दीची सुरुवात 1983 मध्ये केली होती. तिने ‘वेल्लई मनसू’ या तमिळ सिनेमातून सिने इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. चार दशकांच्या चित्रपट कारकीर्दीत राम्याने तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी सिनेमात चांगली ओळख निर्माण केली आहे.
राम्याचे मोठे वक्तव्य
हिंदी सिनेमात राम्या ‘दयावान’, ‘परंपरा’, ‘खलनायक’, ‘चाहत’, ‘बनारसी बाबू’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ यांसारख्या सिनेमात झळकली आहे. तिने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “हिंदी सिनेमात मी माझ्या कोणत्याही सिनेमात चांगली कामगिरी केली नाही. त्यावेळी मी तेलुगू इंडस्ट्रीतील स्टार होते. मी तेलुगू इंडस्ट्री सोडून हिंदी सिनेमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेण्याची माझ्यात क्षमता नव्हती. मला माझ्या हातातून कोणतीही गोष्ट जाऊ द्यायची नव्हती. तुमच्यासाठी कोणत्याही इंडस्ट्रीत यशस्वी सिनेमा देणे महत्त्वाचे असते. हिंदी सिनेमात माझ्यासोबत असे काही झाले नाही. मी तेलुगू सिनेमात काम करणे माझ्यासाठी सहज होते.”
View this post on Instagram
राम्या कृष्णन हिने अनेक सुपरहिट साऊथ सिनेमे दिले आहे. त्यामध्ये ‘अल्लारी प्रियदू’, ‘कांटे कुथूर्ने कनू’, ‘पदायप्पा’, ‘स्वीटी नान्ना जोडी’, ‘पंचतंथीरम’, ‘बाहुबली सीरिज’ आणि ‘सुपर डिलक्स’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
राम्याने वयाच्या पन्नाशी पार केली आहे. ती 51 वर्षांची आहे. तिने साऊथमध्ये काम देणाऱ्या प्रत्येक चित्रपट निर्मात्याचे आभार मानले आहे. ती म्हणाली की, “मी नशीबवान आहे की, मी कमल हासन यांच्यासोबत पंचतंथीरम सिनेमात काम केले. यामध्ये मी मॅगीची भूमिका साकारली होती. त्यावेळी हा सिनेमा यशस्वी होण्यासोबतच हिट झाला होता. यानंतर मी रजनीकांत सरांसोबत पदायप्पा आणि सुपर डिलक्स सिनेमात काम केले. मी या सिनेमात साकारलेल्या भूमिकांमुळे माझा रस्ता सुखकर केला. त्यामुळे मी टाईपकास्टही झाले नाही.”
‘लायगर’ सिनेमात विजयच्या आईची भूमिका
‘लायगर’ या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तिने या सिनेमात विजय देवरकोंडा याच्या आईची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा तमिळ आणि तेलुगूसह इतर भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते पुरी जगन्नाथ यांनी केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्यावर बला’त्काराचा आरोप; म्हणाला, ‘मी तर नामर्द आहे’
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर राजूचे कुटुंब संतापले, उचलले मोठे पाऊल
सोनालीवर ताबा मिळवण्यासाठी तांत्रिकाचा वापर करायचा सुधीर सांगवान, जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा