Wednesday, July 3, 2024

‘बाहुबली’ची शिवगामी ग्लॅमरच्या बाबतीत तरूण अभिनेत्रींनाही देतेय स्पर्धा, पाहा फोटो

‘बाहुबली’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तेलुगू सिनेमातील अभिनेता प्रभासची (Prabhas) लोकप्रियता भारतभर वाढली आहे. मात्र त्याचबरोबर या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना एक वेगळीच ओळख मिळाली आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरला. देशात आणि जगात सर्वत्र या चित्रपटाने वाहवा मिळविली होती. चित्रपटात साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा अप्रतिम होती. अमरेंद्र बाहुबली असो की, कटप्पा किंवा शिवगामी देवी. या चित्रपटात शिवगामी देवीची भूमिका राम्या कृष्णन (Ramya Krishnan) यांनी साकारली होती. या पात्रात त्यांनी जणू जीव ओतला होता. पण पडद्यावर साडी नेसलेली शिवगामी देवी खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहेत.

इतकेच नाही, तर सोशल मीडियावरही त्यांची जबरदस्त फॅन फॉलोविंग पाहायला मिळते. राम्या कृष्णन खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि सुंदर आहेत. त्यांचा लेटेस्ट फोटो पाहून तुम्हाला ओळखणे देखील कठीण झाले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या सेल्फीमध्ये राम्या खूपच सुंदर दिसत आहेत.

दाक्षिणात्य चित्रपट ते हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या राम्या कृष्णन यांचा जन्म १५ सप्टेंबर १९७० रोजी झाला. त्यांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी अभिनयाच्या जगात काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी आत्तापर्यंत तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांसह २०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

राम्या या तमिळ कॉमेडियन रामास्वामी यांची भाची आहे. ज्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये सहज ब्रेक मिळाला. त्यांनी ‘वेल्लई मनसु’ या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी राम्या यांनी दक्षिणेतील चारही भाषांमध्ये काम केले होते.

एका फोटोमध्ये राम्या कृष्णन चमकदार साडी नेसलेली दिसत आहेत. ज्यामध्ये त्या खूप सुंदर दिसत आहेत. ‘बाहुबली’ चित्रपटाव्यतिरिक्त रामा कृष्णन यांबद्दल बोलायचे झाले, तर त्या ‘खलनायक’, ‘चाहत’, ‘शपथ’, ‘बनारसी बाबू’ आहे. याशिवाय त्या वेबसीरिजमध्येही दिसल्या आहेत. त्यांनी ‘क्वीन’ नावाच्या वेब सीरिजमध्ये काम केले होते. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा हा बायोपिक होता.

हेही वाचा –

हे देखील वाचा