Tuesday, July 23, 2024

स्ट्रेच मार्क्सवर कमेंट करणाऱ्यांना राणी चॅटर्जीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘गाढवं फक्त…’

भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने (Rani Chatterjee) तिचे वजन कमी केले आहे. राणीचे वजन आधी ८० किलो होते आणि आता ती ६५ किलो झाली आहे. तिने तिच्या फिटनेसवर किती काम केले आहे, हे तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये दिसतेच. आजकाल राणी पूर्णपणे फिटनेस फ्रिक बनली आहे.

अभिनेत्री अनेकदा तिचे वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर शेअर करत असते. पण वजन कमी झाल्यामुळे अभिनेत्रीच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स आले आहेत. ज्याबद्दल युजर तिला विविध प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. तिच्या लेटेस्ट फोटोमध्ये राणीने अशा युजर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. जे तिचे स्ट्रेच मार्क्स पाहून अश्लील कमेंट करतात.

अशातच भोजपुरी अभिनेत्रीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिची बॉडी एकदम टोन्ड दिसत आहे. या फोटोंमध्ये राणी गुलाबी रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि काळ्या रंगाच्या ट्रॅक पॅन्टमध्ये दिसत आहे आणि आरशासमोर तिचा फोटो क्लिक करत आहे.

हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने तिच्या कॅप्शनमध्ये युजर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. राणी चॅटर्जीने लिहिले, “जर मी माझे वजन ८० वरून ६५ किलोपर्यंत कमी केले, तर माझ्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स असतीलच? पण तरीही गाढवं असे मुर्खासारखे प्रश्न विचारतात. वजन कमी करणे सोपे नाही.”

एकेकाळी राणी चॅटर्जीचे वजन खूप जास्त होते. त्यामुळे तिला खूप ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. पण आता तिचे वजन खूप कमी झाले आहे आणि ती फॅटने एकदम फिट झाली आहे.

भोजपुरी ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखली जाणारी राणी ती तिच्या चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत राहिली असली, तरी तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चाही कमी नाही. ३ नोव्हेंबर १९८९ रोजी मुंबईत जन्मलेली राणी वयाच्या ३२ व्या वर्षीही अविवाहित आहे. तीन अफेअर होऊनही तिला अजून खरे प्रेम मिळालेले नाही.

हेही वाचा-

हे देखील वाचा