भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम व प्रतिसाद देत असतात. तिच्या नवनवीन पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. राणीने नुकतच आता तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील झाली आहे. त्यामुळेच आता तिनेही ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
नुकतेच राणी चॅटर्जीने तिचे जिममधील काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाची स्पोर्ट ब्रा परिधान केली असून, त्यावरून तिने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. मात्र, तिने या फोटोमध्ये जॅकेटची चेन उघडी ठेवून एका बाजूने जॅकेट खांद्याच्या खाली घेतले आहे. त्यामुळे तिला आता प्रचंड ट्रोल केले जात आहे.
नेटकऱ्यांनी “या फोटोंमुळे भोजपुरी चित्रपटसृष्टी बदनाम होत आहे,” असा आरोप केला आहे. यासह अनेक नेटकऱ्यांनी तिला जबरदस्त ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवर राणी चॅटर्जी म्हणाली की, “साहेब, तुम्ही तर भोजपुरी चित्रपटांची खूपच स्वस्त इमेज बनवली. भोजपुरी चित्रपटांची इमेज इतकीही स्वस्त नाही की, एका फोटोने बदनाम होईल आणि तुम्ही चित्रपट पाहता, आम्ही त्यात रात्रंदिवस काम करतो. त्यामुळे चील करा, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेतो आणि मी वास्तविक जीवनात काहीही करेल, त्याच्याशी तुम्हाला काही घेणंदेणं नाही. समजलं.”

यानंतर अभिनेत्रीने ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी पूर्ण जॅकेट काढून फोटो शेअर केला. त्यावर ट्रोलर्सने देखील जोरदार प्रतिक्रिया दिली. या ट्रोलर्सला राणीनेही चोख प्रत्युत्तर दिले आणि लिहिले की, “ओह … आणि तुम्ही धोनीचे नाव वापरत आहात, तरीही काहीही होत नाही. बरं, तुम्ही वापरलेला शब्द, तुमच्या आई आणि बहिणीकडेही आहे. तुम्ही त्यांचा वापर करून तुमचे फॉलोव्हर्स का वाढवत नाहीत, मूर्ख गाढवांनो आदर करा.”
नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना अभिनेत्रीने लिहिले की, “होय भाऊ, मी काय करू, मी फोटो क्लिक करणे बंद करू का?” अशाप्रकारे राणीने ट्रोलर्सना प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. राणी चॅटर्जीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिच्या चोख उत्तराचे कौतुक केले. अभिनेत्रीच्या याा फोटोंना आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस ओटीटी’चा किताब जिंकून घरी परतली दिव्या; बॉयफ्रेंड वरुणने खास अंदाजात केले स्वागत
-राखी सावंतला पती रितेशचा पाठिंबा, राघव चड्ढांच्या ‘या’ विधानावर घेतली त्यांची शाळा
-बाकीच्या पर्वांपेक्षा खास आहे हे पर्व; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं बघू शकाल सलमानचा ‘बिग बॉस’