Wednesday, June 26, 2024

रश्मी देसाईने हद्दच केली पार, थेट कॅमेऱ्यासमोरच उघडली ड्रेसची चैन, Video Viral

बॉलिवूड असो किंवा टेलिव्हिजन यातील कलाकार नेहमीच चर्चेत राहण्यासाठी काही ना काही गोष्टी सततच करत असतात. कधी ते त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळे सर्वांचे लक्ष वेधतात, तर कधी ते सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांना भुरळ घालतात. अशातच टीव्हीवर झळकणारी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई हिने एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 

अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मी पांढऱ्या शुभ्र रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. यादरम्यान ती व्हिडिओमध्ये अचानक मागे वळते आणि तिच्या ड्रेसची चैन उघडू लागते. तिची ही कृती तिच्या चाहत्यांना भलतीच आवडली आहे. त्यामुळे तिच्या या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) 

या व्हिडिओत पुढे दिसते की, रश्मी ड्रेसची चैन उघडल्यानंतर लगेच दुसऱ्या ड्रेसमध्ये दिसते. यामध्ये ती तिच्या स्टनिंग अंदाजाने तिच्या चाहत्यांना भुरळ घालते. रश्मीवर पांढऱ्या रंगाचा एकेरी खांद्यावरील बॉडीकॉन ड्रेस खूपच शोभून दिसत आहे. सोबतच ती बन आणि गडद मेकअपसोबत न्यूड लिपस्टिकने अभिनेत्रीच्या लूकला चार चाँद झाले आहेत. व्हिडिओ शेअर करत रश्मीने कॅप्शनमध्ये “चला त्यांना दाखवून देऊ,” असे लिहिले आहे.

अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच, सर्वत्र पाहिला जात आहे. आतापर्यंत इंस्टाग्रामवर या व्हिडिओला १० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ७० हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. दुसरीकडे, या व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले आहे की, “खूपच सुंदर.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “पाहा चंद्र अवतरला.” तसेच, आणखी एकाने लिहिले की, “तुझं सौंदर्य व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीयेत.” अशाप्रकारे अनेक चाहते तिच्या कौतुकाचे पूल बांधत आहेत.

रश्मी देसाईच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘श्श्श, फिर कोई है’, ‘उतरण’, ‘परी हूं मैं’, ‘स्टार्स का तडका’, ‘हाँटेड नाईट्स’, ‘इश्क का रंग सफेद’, ‘दिल से दिल तक’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा