Sunday, January 18, 2026
Home साऊथ सिनेमा रश्मिका मंदानाने अल्लू अर्जुनला पाठवले खास गिफ्ट, नोट लिहून व्यक्त केले प्रेम

रश्मिका मंदानाने अल्लू अर्जुनला पाठवले खास गिफ्ट, नोट लिहून व्यक्त केले प्रेम

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) जेव्हाही त्याचा चित्रपट घेऊन येतो तेव्हा इंटरनेटवर राडा घालत असतो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आजकाल त्यांचा आगामी चित्रपट ‘पुष्पा: द राइज’च्या (Pushpa: the rise) प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. दोघांची लव्ह केमिस्ट्री पडद्यावर पाहण्यासाठी लाखो चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. ‘पुष्पा’मध्ये अल्लूसोबत काम करण्याचा अभिनेत्रीला चांगला अनुभव आला आणि म्हणूनच रश्मिकाने तिच्या सहकलाकाराला खास भेट पाठवली आहे. अल्लूला अलिकडेच रश्मिकाने त्याच्या घरी पाठवलेल्या भेटवस्तूंचा बॉक्स मिळाला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे फोटो शेअर केले आहेत.

नॅशनल क्रश रश्मिकाने अल्लूला खाण्यासाठी स्वादिष्ट पदार्थ पाठवले आहेत आणि त्यासोबत तिने एक हाताने लिहिलेली नोटही पाठवली आहे. या चिठ्ठीत लिहिले होते, “सर तुम्हाला काहीतरी पाठवावेसे वाटले… पुष्पासाठी  शुभेच्छा! लव्ह रश्मिका.” सोशल मीडियावर रश्मिकाच्या भेटवस्तूचा हा फोटो आणि तिची नोट शेअर करत अभिनेत्याने लिहिले की, “प्लेजन्ट सरप्राइजसाठी धन्यवाद डियर..” अल्लूच्या मेसेजला रश्मिकाने उत्तर दिले, “सर गरुउ.. लव्ह आणि ओनली लव्ह यू.”

रश्मिका नुकतीच सुट्टीवरून परतली आहे, अलिकडेच ती पॅरिसला सुट्टीसाठी गेली होती. ज्याच्या फोटोंनी सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. ‘पुष्पा: द राइज’ सुकुमार दिग्दर्शित असून, ज्याचा पहिला भाग १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. तेलगू व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. यात मल्याळम अभिनेता फहद फासिल मुख्य भूमिकेत आहे.

‘पुष्पा’शिवाय रश्मिकाकडे ‘आडवाल्लू मीकू जोहरलू’ आणि ‘मिशन मजनू’ सारखे तेलुगु चित्रपटही आहेत. लवकरच ती बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या ‘गुडबाय’ या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा