Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

एकेकाळी राहुल द्रविडच्या प्रेमात ठार वेडी झाली होती रवीना टंडन? अभिनेत्रीने ‘त्या’ नात्याबाबत सोडले मौन

बॉलिवूड विश्वात अनेकदा अभिनेत्रींच्या लिंकअपच्या चर्चा रंगत असतात. पण हे काही नवीन नाही. यापूर्वीही असेच होत आले आहे. त्यातले काही खरे आहे तर काही खोटे. आता अभिनेत्री रवीना टंडनबद्दल सुरुवातीला असे म्हटले जात होते की, तिचे अक्षय कुमारसोबत नाते होते. तिने अभिनेत्याशी साखरपुडा केला होता. जरी रवीनाने चित्रपट वितरक आणि निर्माता अनिल थडानीशी लग्न केले. पण आणखी एक व्यक्ती आहे, ज्याच्याशी रवीनाचे नाव जोडले गेले होते आणि ते म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज राहुल द्रविड.

रवीनाबद्दल (Raveena Tandon) २००२ मध्ये असे म्हटले गेले होते की, तिचे राहुल द्रविडसोबत (Rahul Dravid) नाते आहे आणि या अफवा इतक्या पसरल्या होत्या की, हे दोघेही लग्न करणार होते. पण प्रत्यक्षात प्रकरण वेगळे होते. खुद्द रवीनाने याला स्पष्ट नकार दिला होता. ती म्हणाली की, ती त्याला वैयक्तिकरित्या ओळखत देखील नाही. ती त्याला सर्व मित्रांसोबत भेटली होती.

माध्यमांशी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, “देवासाठी… तो माझ्या ओळखीचाही नाही. बिचारा, माझ्याकडे त्यांच्याविरुद्ध काहीही नाही. पण हे खूपच अस्वस्थ आहे. सध्या मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.” जेव्हा रवीनाला विचारण्यात आले की, ती त्याला भेटली आहे का, तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, “त्याचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र आहेत, त्यापैकी ती एक मैत्रीण आहे. म्हणूनच ती कुठेही जायची तेव्हा राहुल तिला बघायचा आणि फक्त हाय हॅलो करायचा. ती त्याला एकटी कधीच भेटली नाही.”

रवीनाला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की, जेव्हा ती त्याला वैयक्तिकरित्या ओळखतही नव्हती, तेव्हा अशा अफवा उडण्याचे कारण काय? यावर अभिनेत्री म्हणाली की, “तिलाही माहित नाही. कदाचित राहुल द्रविड बॅचलर होता.” रवीनाने सांगितले की, “तिचे नाव केवळ राहुलसोबत जोडले गेले नाही, तर तिचे नाव संगीत दिग्दर्शक संदीप चौटा यांच्याशीही जोडले गेले होते, जरी ती त्याला ओळखतही नव्हती.”

रवीना टंडनने २००४ मध्ये अनिल थडानीसोबत लग्न केले होते. तिच्या राहुल द्रविडसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांनंतर दोन वर्षांनी राहुलने २००३ मध्ये नागपूरच्या सर्जन विजेता पेंढाकरशी लग्न केले.

हेही वाचा :

हे देखील वाचा