अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि पॉप गायक निक जोनास (Nick Jonas) नुकतेच सरोगसीच्या मदतीने पालक बनले आहेत. शुक्रवारी (२१ जानेवारी) प्रियांकाने स्वतः सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली. तेव्हापासून सरोगसी हा शब्द पुन्हा चर्चेत आला आहे. केवळ प्रियांकाच नव्हे, तर यापूर्वीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सरोगसीद्वारे मातृत्वाचा आनंद लुटला आहे.
आता काहीजणांना प्रश्न पडला असेल की, सरोगसी म्हणजे नेमकं काय? चित्रपटांमध्येही अनेकदा हा मुद्दा मांडला गेला आहे, मग तो क्रिती सेननचा ‘मिमी’ असो, नाहीतर याचाच ओरिजिनल चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ असो. हे चित्रपट पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की, सरोगसी किंवा सरोगेट मदर म्हणजे नेमकं काय असतं! आज या लेखात आपण याच विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहे सरोगसी?
सरोगसी हे मूल जन्माला घालण्याचे नवीन तंत्र आहे. जेव्हा आई किंवा वडिलांमध्ये कोणत्याही शारीरिक दुर्बलतेमुळे मूल जन्माला घालण्याची क्षमता नसते किंवा काही कमतरता असते, तेव्हा ते या तंत्राचा अवलंब करू शकतात.
सरोगसीमध्ये काय काय होतं?
सरोगसी म्हणजे दुस-याचे मूल आपल्या पोटात वाढवणे, हे आतापर्यंत तुम्हाला समजलं असेलच. यासाठी सरोगेट आई पैसे घेते. तसेच, सरोगेट आईच्या गरोदरपणात आरोग्याची पूर्ण काळजी घेणे आणि सर्व खर्चाची जबाबदारी घेणे त्या जोडप्याचे काम आहे.
सरोगेट आईच्या गर्भात कसं जातं मूल?
बहुसंख्य लोकांना माहित आहे की मूल होण्यासाठी पती-पत्नी किंवा स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक संबंध असणे आवश्यक आहे. पण या प्रक्रियेत तसे नाही.
एखाद्या महिलेला सरोगसीसाठी तयार केल्यानंतर, डॉक्टर पुरुषाच्या शरीरातून शुक्राणू घेतात आणि आयव्हीएफ तंत्राद्वारे महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपण करतात. सरोगेट आई होणारी महिला आणि जोडपे यांच्यात एक विशेष करार केला जातो. सरोगेट आईला स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि गर्भधारणेदरम्यान वैद्यकीय गरजांसाठी पैसे दिले जातात. तसेच ती महिला सरोगसीसाठी वेगळी रक्कम आकारते.
सरोगसीचे दोन प्रकार
१. ट्रॅडिशनल सरोगसी
ट्रॅडिशनल सरोगसीमध्ये, वडिलांचे शुक्राणू सरोगेट आईच्या अंड्यांशी जुळवले जातात. या सरोगसीमध्ये मुलाचा अनुवांशिक संबंध फक्त वडिलांशी असतो.
२. जेस्टेशनल सरोगेसी
या पद्धतीत वडिलांचे शुक्राणू आणि आईची अंडी सरोगेट आईच्या गर्भाशयात मेल टेस्ट ट्यूबद्वारे रोपण केली जातात. यातून जन्माला आलेल्या मुलाचा आई आणि वडील दोघांशी अनुवांशिक संबंध असतो.
हेही वाचा :
नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान