चित्रपटसृष्टीत कधी काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही. दररोज काही ना काही नवीन घडतच असतं. या इंडस्ट्रीमध्ये घडणाऱ्या गोष्टींवर लोकांचा विश्वास बसत नाही. कलाकार कधी कोणत्या मूडमध्ये असतील हे सांगता येत नाही. हे कलाकार कधी कोणत्या रूपात दिसतील हेही कोणाला माहित नाही. बऱ्याच वेळा आपण कलाकारांना त्यांच्या चाहत्यांशी प्रेमाने वागताना पाहतो. मात्र कधीकधी हेच कलाकार त्यांच्या रागावर नियंत्रन ठेवू शकत नाहीत आणि रागाचा स्फोट होतो.
बऱ्याचदा शांत आणि सभ्य असणारे कलाकार देखील कधीकधी वेगळेच रूप घेतात. असंच काहीसं बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनसोबतही घडलं आहे. जे ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एकदा रवीना टंडन एका पार्टीत गेली होती. तेव्हा ती इतकी भडकली की, तिने एका व्यक्तीच्या अंगावर ज्यूसचा ग्लास ओतला. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, तिच्या पतीची एक्स पत्नी होती. रवीनाच्या या वागण्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. मात्र हे खरंच घडलं आहे. खरं तर ही घटना काही वर्षापूर्वीच्या न्यू इयर पार्टीची आहे.
खरं तर ही पार्टी रितेश सिधवानीने नवीन वर्षाच्या निमित्ताने ठेवली होती. अभिनेत्री रवीना टंडन पती अनिल थडानीसह या पार्टीमध्ये गेली होती. तेव्हा अनिल थडानीची एक्स पत्नी देखील या पार्टीला आली होती. पार्टीमध्ये अनिल थडानीची एक्स पत्नी नताशा सिप्पी त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. रवीना टंडन सर्वकाही शांतपणे पाहत होती. मात्र काही वेळानंतर ती हे सहन करू शकली नाही आणि तिने ज्यूसनी भरलेला ग्लास नताशाच्या अंगावर फेकला.
या संदर्भात माध्यमांनी या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. यावर बोलताना रवीना टंडन म्हणाली होती की, “जर कोणी तिच्या पतीचा किंवा कुटुंबाचा अपमान करेल, तर ती त्या व्यक्तीला सोडणार नाही.” तर दुसरीकडे त्याचवेळी नताशा सिप्पी म्हणाली होती की, “रवीना विनाकारण असुरक्षित होत होती. तिने ज्यूसचा ग्लास इतक्या वेगाने फेकला होता की, तिचे बोट कापले गेले होते.”
अभिनेत्री रवीना टंडन आणि अनिल थडानी यांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. दोघांना दोन मुलेही आहेत. रवीना अनेकदा तिच्या मुलीचे आणि संपूर्ण कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. संपूर्ण जगात तिचे चाहते पाहायला मिळतील.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…
-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच