Saturday, July 6, 2024

अभिनय टाळण्यासाठी रेखा जेव्हा सेटवरून गायब व्हायच्या, तेव्हा ‘या’ कारणामुळे अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये ठेवले पाऊल

बॉलिवूड जगताला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रेखा यांचा चाहतावर्ग किती मोठा आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही. रेखा यांचे नाव घेताच त्यांचे ‘इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं…’ हे गाणे आठवते. त्यांच्या काळातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रेखा यांना चाहत्यांची कमी नाही. आजही त्या आपल्या स्टाईलने नव्या युगातील अभिनेत्रींशी स्पर्धा करतात. रेखा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यावेळी त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या खुलाशांमुळे चर्चेत आहे, जे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीत केला होता. आता त्यांची जुनी मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आपल्या काळातील अनेक बड्या कलाकारांसोबत सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रेखाबद्दल (Rekha) तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांना कधीही चित्रपटांचा भाग व्हायचे नव्हते. ही गोष्ट त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितली होती. रेखा यांनी सांगितले होते की, जेव्हा त्यांना एका हिंदी चित्रपटासाठी संपर्क करण्यात आला, तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांना कधीच बॉलिवूड इंडस्ट्रीत येण्याची इच्छा नव्हती. त्यांचे बॉलिवूडमध्ये येण्याचे एकच कारण होते.

हिंदी येत नसतानाही त्यांना या चित्रपटात साईन करण्यात आले हे भाग्यच आहे, असे रेखा यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. त्यावेळी ना त्यांना हिंदी येत होती आणि ना त्यांना या इंडस्ट्रीचा भाग व्हायचे होते. पण त्यांनी चित्रपटात यावे आणि एक दिवस मोठी अभिनेत्री व्हावे, ही त्यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळेच त्या बॉलिवूडमध्ये आल्या.

त्यांनी पुढे सांगितले की, “मला सहा वर्षे सक्तीने वागवण्यात आले.” त्या शूटला न जाण्याचं कारण सांगायच्या. त्या शूटिंगला यायच्या, तर कधी सेटवरून गायब व्हायच्या, तर कधी आजारपणात. १९७५ मध्ये त्यांनी विचार बदलला आणि अभिनयावर लक्ष केंद्रित केले. खरंतर १९७५ मध्ये आलेल्या ‘घर’ चित्रपटानंतरच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

रेखा सध्या कोणत्याही चित्रपटाचा भाग नाहीत, परंतु त्या बर्‍याचदा इव्हेंट्स आणि अनेक टेलिव्हिजन शोमध्ये पाहुण्या म्हणून सहभागी होताना दिसतात. त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काही काळानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये येण्याची संधी मिळाली आणि त्या प्रसिद्ध अभिनेत्री बनल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

 

 

हे देखील वाचा