Monday, June 24, 2024

पत्नीच्या ‘या’ गोष्टीला अक्षरशः कंटाळलाय शाहिद कपूर, म्हणतोय ‘त्याच्याशीच लग्न कर’

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांना पावर कपल म्हटले जाते. दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खूश आहेत. त्यांच्यातील प्रेम आणि केमेस्ट्री देखील त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. पण मीरा राजपूतच्या एका सवयीमुळे शाहिद कपूर चांगलाच नाराज झाला, असून त्याने सोशल मीडियावर याचा खुलासा केला आहे. शाहिद कपूरने नुकताच मीरा राजपूतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून चाहते खूप खुश होत आहेत. 25 फेब्रुवारी 1981 रोजी शाहिद कपुर याचा जन्म झाला. या निमित्ताने त्याच्या जीवनाविषयी जाणुन घेऊ या…

शाहिद कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अलीकडेच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याची पत्नी मीरा देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मीरा राजपूत फोनमध्ये बिझी दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत शाहिदने लिहिले की, “मीराने फोनशी लग्न केले आहे.” मीरा पती शाहिदकडे अजिबात लक्ष देत नसून ती फोन चालवण्यात व्यस्त असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. शाहिदच्या या व्हिडिओवर मीरा राजपूतने तिची प्रतिक्रिया दिली आहे. आता सोफ्यावरच लग्न करू, असं त्यांनी लिहिलं आहे.

मीरा राजपूतने चित्रपट अभिनेता शाहिद कपूरसोबत लग्न केल्यानंतर प्रसिद्धीझोतात आली. 7 जुलै 2015 रोजी दोघांचे लग्न झाले. मीरा राजपूत आणि शाहिद कपूरचे कुटुंब एकमेकांना आधीच ओळखत होते. मीरा राजपूत शाहिद कपूरपेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. मीरा राजपूतचे लग्न झाले, तेव्हा ती केवळ 21 वर्षांची होती. मीराने आपले सुरुवातीचे शिक्षण वसंत व्हॅली स्कूलमधून पूर्ण केले. त्यांनी संयुक्त राष्ट्रात इंटर्नशिपही केली आहे. मीरा राजपूतने लेडी श्री राम कॉलेजमधून इंग्रजी ऑनर्सची पदवी घेतली आहे.

शाहिद आणि मीरा यांची पहिली भेट एका सत्संगात झाली होती. शाहिद त्याचे वडील पंकज कपूर यांच्यासोबत दिल्लीत सत्संगाला जात असे. या सत्संगात मीराचे कुटुंबीयही यायचे आणि इथेच दोघांची भेट झाली. दोघांच्या मैत्रीनंतर पंकज कपूर यांनी मीराच्या वडिलांसमोर दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि अशाप्रकारे मीरा शाहिदची पत्नी बनली.

शाहिद आणि मीरा (शाहिद मीरा वेडिंग) यांच्या लग्नाला यावर्षी सात वर्षे पूर्ण होत आहेत. दोघांना मीशा आणि झैन ही दोन मुले आहेत. लग्नाच्या पुढच्याच वर्षी मीराने एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव मीशा कपूर आहे. त्याचवेळी मीशा दोन वर्षांची असताना मीरा दुसऱ्यांदा आई झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. झैन कपूर सध्या तीन वर्षांची आहे आणि मीशा पाच वर्षांची आहे. मीरा अनेकदा आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (shahid kapoor share a video with mira rajput on social media )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

200 काेटींची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर का रडला ढसा ढसा ? एकदा वाचाच

हे देखील वाचा