‘लो चली मैं’, म्हणत संपूर्ण देशाला वेड लावणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणे गुरुवारी ( ७ ऑक्टोबर) आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. रेणुका शहाणे यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटांपासून केली. मात्र बॉलिवूडमध्येही त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवला. रेणुका शहाणे यांना सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सूरज बडजात्या यांच्या ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातून अमाप लोकप्रियता मिळाली. या सिनेमातून त्यांची एक आदर्श, सोज्ज्वळ अशा सुनेची प्रतिमा तयार झाली. अनेक वर्ष अभिनयात सक्रिय असणाऱ्या रेणुका यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनातही हात अजमावून पाहिला. एक अभिनेत्री म्हणून प्रभावी अभिनय करणाऱ्या रेणुका यांनी दिग्दर्शकाची भूमिका अगदी चोख सांभाळली.
रेणुका शहाणे यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे. गेल्या वर्षी त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘त्रिभंगा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात काजोल मुख्य भूमिकेत होती आणि या चित्रपटाला चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली होती.
रेणुका शहाणे यांना १९९४ मध्ये ‘अबोली’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेयर मराठी पुरस्कारही देण्यात आला होता. रेणुका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे सतत चर्चेत येत असतात. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीबाबत त्या त्यांचे मतं मांडताना दिसतात. कधीकधी त्यांना टीकेला देखील सामोरे जावे लागते, मात्र त्या मागे हटत नाही.
रेणुका यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच आशुतोष राणासोबतची त्यांच्या प्रेमकथाही खूप चर्चेत आहेत. आशुतोष राणा आणि रेणुका यांची प्रेमकथा एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. रेणुका यांचे यापूर्वी मराठी रंगमंचाचे दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी लग्न झाले होते. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.
आशुतोष राणा यांनी पहिल्याच भेटीत रेणुका यांना सांगितले होते की, ते त्यांचे किती खूप मोठे चाहते आहेत आणि पहिल्याच भेटीत ते रेणुका यांच्या प्रेमात पडले होते. आशुतोष राणासोबत रेणुका यांची पहिली भेट फिल्ममेकर हंसल मेहता यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. रेणुका तेव्हा आशुतोष राणा यांना जास्त ओळखत नव्हत्या. त्यावेळी ते फार लोकप्रिय झाले नव्हते.
दोघांची पहिली भेट फक्त कामामुळे झाली होती. दोघांनीही एकमेकांना त्यांचे नंबर दिले. आशुतोष राणा यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी रेणुका शहाणे यांना फोन केला, पण दोघेही बोलू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी रेणुका यांनी त्यांना परत बोलावले आणि तिथेच त्यांची मैत्री झाली.
अखेरीस ते दोघे फोनवर सतत एकमेकांच्या संपर्कात होते आणि काही महिन्यानंतर दोघे पुन्हा भेटले. त्यानंतर आशुतोष राणा रेणुका यांना इंप्रेस करण्यात यशस्वी झाले. दोघांनी २००१ मध्ये लग्नगाठ बांधली. आजही ते एकमेकांना चांगली साथ देत असून, दोघांना शौर्यमन आणि सत्येंद्र नावाचे दोन मुले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बऱ्याच काळापासून गायब असणारा इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे तरी कुठे?
–फॅशन वीकमध्ये जलवे दाखवल्यावर पॅरिसच्या रस्त्यांवर अभिषेक, आराध्यासोबत फिरताना दिसली ऐश्वर्या राय
–रणबीरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी होणार सुरु, ‘या’ भूमिकेत दिसणार लव्हर बॉय