बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आपल्या कामावर परतली आहे. याची माहिती खुद्द रियानेच सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे. बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती दोन वर्षे कामापासून दूर होती. परंतु आता ती पुन्हा तिचे सामान्य जीवन जगत आहे आणि कामावर परतल्यानंतर तिला बरे वाटू लागले आहे.
रिया दोन वर्षांनी परतली कामावर
रिया (Rhea Chakraborty) गेल्या काही दिवसांपासून सतत मोटिव्हेशनल कोट्स शेअर करत होती. आता तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूप खुश दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काल मी २ वर्षांनंतर कामावर गेले आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात ज्यांनी मला साथ दिली त्यांचे आभार. हरकत नाही, सूर्य नेहमी चमकतो. कधीही हार मानू नका.” १४ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूतचे निधन झाले होते.
हेही पाहा : सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal
सुशांतसाठी लिहिलेली भावनिक पोस्ट
सुशांतच्या (Sushant Singh Rajput) पहिल्या पुण्यतिथीनिमित्त रियाने एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली होती. सुशांतसोबतचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आतापर्यंत असा एकही क्षण गेला नाही, जेव्हा मला वाटले की तू इथे नाहीस. असे म्हणतात की, वेळ सर्व काही बरे करते, परंतु तू माझा वेळ आणि सर्व काही होतास. मला माहित आहे की, आता तू माझा गार्जियन एंजेल आहेस आणि तू तुझ्या दुर्बिणीद्वारे चंद्रापासून माझे रक्षण करत आहेस. मी रोज तुझी येण्याची वाट पाहते, तू ये आणि मला घेऊन जा, मी तुला सर्वत्र शोधत आहे. मला माहित आहे तू माझ्यासोबत आहेस.”
महिनाभर काढले तुरुंगात दिवस
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने सप्टेंबर २०२० मध्ये रिया चक्रवर्तीला अटक केली. जवळपास महिनाभर ती तुरुंगात राहिली. मात्र, त्यानंतर रियाची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती यालाही एनसीबीने अटक केली होती. त्याचीही डिसेंबरमध्ये तुरुंगातून सुटका झाली. रिया चक्रवर्ती शेवटची ‘चेहरे’ चित्रपटात दिसली होती. ज्यात तिने इमरान हाश्मी, अमिताभ बच्चन, सिद्धार्थ कपूर यांसारख्या स्टार्ससोबत काम केले होते.
हेही वाचा –
- कमल हासन यांची पत्नी अभिनेत्री सारिका यांची कहाणी आहे खूपच दुःखद , मुलांनीही दिला ‘हा’ मोठा धक्का!
- ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्रींनीं पहिला संसार मोडून घेतला घटस्फोट, जाणून घ्या संपूर्ण यादी
- ‘या’ जर्मन अभिनेत्रीने गाजवले बॉलिवूड, चित्रपटातून मिळाली लोकप्रियता