Friday, March 29, 2024

कमल हासन यांची पत्नी अभिनेत्री सारिका यांची कहाणी आहे खूपच दुःखद , मुलांनीही दिला ‘हा’ मोठा धक्का!

आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या सारिका यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. सारिका यांनी लहानपणापासूनच काम करायला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून सारिका यांना खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र, सारिका यांना एका मजबुरीमुळे अगदी लहान वयात काम करावे लागले होते, हे तुम्हाला माहीत आहे का? खरे तर सारिका यांचे वडील त्यांना आणि आईला सोडून गेले होते. अशा परिस्थितीत घर चालवण्याची सर्व जबाबदारी सारिका यांच्या आईवर येऊन पडली आणि इच्छा नसतानाही सारिका यांना अगदी लहान वयातच नोकरी करावी लागली.

माध्यमांतील वृत्तानुसार, पैशांअभावी सारिका (Sarika) शाळेतही जाऊ शकल्या नाही. सारिका जे काही पैसे कमवत असे, ते त्यांची आई ठेवत असे. त्यांच्या आईच्या या वर्चस्वपूर्ण वागण्यामुळे, अभिनेत्री सर्व सोडून चेन्नईला गेली. सारिका यांनी त्यांच्या काळातील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सारिका यांचे लग्न दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन (Kamal Hassan) यांच्यासोबत झाले होते. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि २००५ मध्ये अभिनेत्रीचा घटस्फोट झाला.

हेही पाहा : आरआरआर सिनेमातील Ajay Devgan आणि Alia Bhattच्या मानधनात तयार होऊ शकतो Bollywoodचा आख्खा एक चित्रपट?

घटस्फोटानंतरही सारिका यांचा त्रास कमी झाला नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, सारिका यांच्या दोन्ही मुली श्रुती हासन (Shruti Hassan) आणि अक्षराने (Akshara Hassan) लग्नानंतर आईऐवजी वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. सारिका यांना याचा मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही सारिका चित्रपटांमध्ये काम करून स्वत:ला व्यस्त ठेवतात.

कमल हासन यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी दोन लग्ने केली आहेत. त्यांनी पहिले लग्न १९७८ मध्ये वाणी गणपतीशी, तर दुसरे लग्न सारिका यांच्याशी केले. कमल हासन यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ते तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसले आहेत. त्यांना आतापर्यंत ४ राष्ट्रीय पुरस्कार, १७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. पटकथा लेखक म्हणून त्यांनी पहिल्यांदा ‘उनारचिगल’ लिहिले आहे.

हेही वाचा –

 

 

 

हे देखील वाचा