असे म्हणतात की, कोणालाही मिठी मारल्याने तुमच्यात सकारात्मकता आणि प्रेमाची भावना वाढते. अनेकवेळा ही जादूई मिठी समोरच्या व्यक्तीसाठी कोणत्याही औषधापेक्षा कमी काम करत नाही. बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा (Risha Chadha) सध्या असेच प्रेम पसरवत आहे. याचा पुरावा म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे.
लोकांना मारत आहे मोफत मिठी
ऋचा चढ्ढाचा (Richa Chadha) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, अभिनेत्रीने हातात एक बॅनर धरला आहे, ज्यावर ‘फ्री हग्स’ असे लिहिले आहे. हा टॅग हातात धरून ऋचा चढ्ढा मुंबईच्या रस्त्यांवर फिरत आहे आणि प्रत्येकाला तिला एक-एक करून मिठी मारण्याची संधी देत आहे. तेही अगदी मोफत.
सर्व वयोगटातील लोकांना मारतेय मिठी
या व्हिडिओमध्ये ऋचा चढ्ढा रस्त्यावर उभी राहून सर्व वयोगटातील लोकांना मिठी मारत असल्याचे दिसत आहे. सोबतच ती काही लोकांना काहीतरी बोलतानाही दिसत आहे. अभिनेत्रीला असे पाहून अनेक लोक तिच्याकडे येऊन मिठी मारत आहेत आणि अभिनेत्री तिला आनंदाने मिठी मारत सर्वांना जादूची मिठी देत आहे.
रस्त्यावर दिसली होती एका मांजरीसोबत
याआधी ऋचा चढ्ढा एका मांजरीसोबत रस्त्यावर दिसली होती. विशेष म्हणजे अभिनेत्रीच्या लूकपेक्षा तिने मांजर ठेवलेल्या बॅगचीच जास्त चर्चा झाली. रिचा एक पारदर्शक बॅग घेऊन आली होती. ज्यात तिची मांजर आरामात बसली होती. मांजरेची पिशवी घेतल्याने या अभिनेत्रीला पाहून जोरदार चर्चा होऊ लागली होती.
‘द ग्रेट इंडियन मर्डर’मध्ये दिसली होती अभिनेत्री
रिचा चढ्ढा शेवटची वेबसीरिज ‘द ग्रेट इंडियन मर्डर’मध्ये दिसली होती. यामध्ये रिचाने डीसीपी सुधा भारद्वाज यांची भूमिका साकारली होती. ही वेबसिरीज ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाली आहे. तुम्ही ती डिझनी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
हेही वाचा –