‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ


हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून ऋचा चड्ढाचे नाव समोर येते. उत्तम अभिनयसोबतच तिचा बेधडकपणा सर्वांनाच भावतो. अनेकदा ती तिच्या या स्वभावामुळे अडचणीत देखील सापडली आहे. वाद आणि ऋचा यांचे जुने नाते आहे. ऋचा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील नेहमी चर्चेचा विषय ठरते. तसेच ती सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ऋचा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील अनेकदा वादात सापडली आहे.

ऋचाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये तिचा एक वेगळा लूक आणि धमाकेदार डान्स दिसत आहे. ऋचाचा हा व्हिडिओ ब्लॅक एँड व्हाइट रूपात दिसत असून, यात ऋचा जुन्या काळातल्या अभिनेत्रींसारखी दिसत आहे. ‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ या गाण्यावर ती जबरदस्त एक्सप्रेशन देताना दिसत आहे.

ऋचाने हा व्हिडिओ तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करताना लिहिले, ‘पब्लिक डिमांडवर पुन्हा हा व्हिडिओ मी शेअर करत आहे.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत असून, नेटकऱ्यांच्या एक से बढकर एक कमेंट यावर येत आहे, तर अनेक लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, त्यांना माहित आहे, तिचा इशारा कोणाकडे आहे. एका युझरने लिहिले, “राज कुंद्रा तर गेला मात्र आम्ही तुम्हाला कोणत्याही टेन्शनमध्ये नाही पाहू शकत. काळजी घ्या.” दुसऱ्याने लिहिले, “दाढीवाल्याच्या अभिनयावरून लक्षात आले की निशाणा कुठे आहे.” अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स ऋचाच्या व्हिडिओवर येत आहेत.

ऋचाचा काही दिवसांपूर्वीच ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आगामी काळात ऋचा ‘फुकरे-३’ आणि ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रितेश अन् सोनाक्षीच्या ‘ककुडा’ चित्रपटाची शूटिंग सुरू, ‘हा’ मराठमोळा निर्माता पहिल्यांदाच करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.