सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १४’ ची विजेती रुबीना दिलैक सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती दररोज तिच्या चाहत्यांसोबत मनोरंजक पोस्ट शेअर करताना दिसते. त्याचवेळी, अलीकडेच रुबीना तिच्या अशाच एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. रुबीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितले आहे की, कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर तिने ७ किलो वजन कसे वाढवले. ते कमी करण्याच्या अनेक प्रयत्नांनंतर आता ती तिच्या शरीरावर प्रेम करायला शिकत आहे.
लेटेस्ट फोटोशूट केले शेअर
अभिनेत्री रुबीना दिलैकने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रुबीना सिल्व्हर कलरचा शिमरी गाऊन घातलेली दिसत आहे. या ऑफ शोल्डर गाऊनवर तिने स्टायलिश वेणी घातली आहे. या फोटोमध्ये रुबीना खूप सुंदर दिसत आहे. एवढेच नाही तर तिने याचसोबत चाहत्यांना एक सुंदर संदेशही दिला आहे.
कॅप्शनमध्ये लिहिली मनातील गोष्ट
रुबीनाने हे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये मनातील गोष्ट लिहिली. तिने लिहिले की, “मी स्वतःवर पुन्हा एकदा प्रेम करायला शिकत आहे. मला याची जाणीव झाली आहे की, एक परिपूर्ण दुबळे शरीर हे नाही दाखवू शकत की, मी कोण आहे…. मी कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर मी ७ किलो वजन वाढवले होते. ज्यामुळे मला अस्वस्थ वाटत होते. माझा आत्मविश्वास देखील कमी झाला! मी पुन्हा ५० किलो वजनापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला पण… म्हणून माझ्या सुंदर लोकांसाठी इथे एक छोटीशी झलक ज्याचा मी सध्या सराव करत आहे! वजनाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. तुमच्या दिसण्याशी नाही…. तुमच्या शरीरावर दयाळू व्हा.”
रुबीनाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘छोटी बहू’पासून केली होती. त्यानंतर २०१२ मध्ये, तिने सोनी टीव्हीच्या ‘सास बिना ससुराल’ मध्ये काम केले होते. २०१३ मध्ये तिने झी टीव्हीच्या ‘पुनर्विवाह- एक नई उमेद’मध्ये दिव्या जाखोटियाची भूमिका साकारली. २०१३ ते २०१४ पर्यंत तिने लाइफ ओकेच्या पौराणिक शो ‘देवो के देव … महादेव’ आणि सब टीव्हीच्या ‘जीनी और जुजू’ मध्येही तिने काम केले आहे. २०१६ ते २०२० पर्यंत तिने कलर्स टीव्हीच्या ‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ मध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘लक्ष वेधण्यासाठी कपडे काढणे, हा माझा अजेंडा नाही’, म्हणत निया शर्माने ट्रोलिंगवर सोडले मौन
-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे