Saturday, June 29, 2024

अरे देवा! 50 किलोच्या अभिनेत्रीने 31 किलोचा घातला लेहेंगा

अभिनेत्री रुबिना दिलीक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. टीव्हीनंतर आता रुबिना रिऍलिटी शोमध्येही आपला जलवा दाखवताना दिसत आहे. दुखापतीतून सावरलेल्या रुबिनाने अलीकडेच 31 किलोचा लेहेंगा घालून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. 36 कळ्यांच्या या 31 किलोच्या लेहेंग्यात रुबिना खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल होत आहे.

रुबिनाने 31 किलोचा लेहेंगा केला परिधान
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक (rubina dilaik) तिच्या लूकसाठी सतत चर्चेत असते. ‘झलक दिखला जा’ (zalak dikh la ja) या शोमध्ये आपल्या धमाकेदार डान्सने चाहत्यांची मने जिंकणारी रुबीना यापूर्वी जखमी झाली होती. यानंतर आता दुखापतीतून सावरल्यानंतर रुबिनाने धमाकेदार पुनरागमन केले आहे. शोमध्ये सेटवर जाण्यासाठी रुबिनाने 31 किलोचा लेहेंगा परिधान केला होता. त्याचा हा व्हिडिओ नुकताच साेशल मीडियावर समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

ज्यामध्ये रुबिनाने सुंदर लेहेंगा घातला आहे. यामध्ये रुबीना सांगते की, हा 36 कळ्यांचा 31 किलोचा लेहेंगा आहे. या लेहेंग्यात रुबिनाचा खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

परफॉर्मन्सदरम्यान रुबिना झाली हाेती जखमी
टीव्हीची जगप्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलीक आता रिऍलिटी शोमध्येही भाग घेते. ‘बिग बॉस 14’ जिंकलेल्या रुबीनाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. टीव्ही जगतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी रुबीना ‘झलक दिखला जा 10’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे. अलीकडेच ती ‘झलक दिखला जा’च्या सेटवर एका परफॉर्मन्सदरम्यान जखमी झाली होती. त्यानंतर तिला स्ट्रेचरवर बाहेर काढण्यात आले हाेते. आता रुबिना बरी होऊन सेटवर परतली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नवरा- बायकाेच्या भांडणात नंदेनं केलं दुर्लक्ष; अभिनेत्री म्हणाली, ‘ताईनं कधीच नातं…’
आतापर्यंत बेबी बंप फोटो शेअर केलेल्या सर्व अभिनेत्रींना बिपाशाने टाकले मागे, पाहा बाेल्ड फाेटाे

हे देखील वाचा