Sunday, July 14, 2024

धक्कादायक! रिहर्सल करताना सहकाऱ्याने मारली उडी अन् मोडली रुबीनाची मान, घटना कॅमेऱ्यात कैद

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलीक सध्या ‘झलक दिखला जा 10‘ या डान्स रिऍलिटी शोमध्ये दिसत आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या आकर्षक नृत्य कामगिरीसाठी भरपूर प्रशंसा मिळवते. यासाठी ती खूप मेहनत देखील घेते. मात्र, सध्या अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी एक अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. रुबिनाला डान्स प्रॅक्टिस करताना खांद्याला दुखापत झाली आहे. स्वतः अभिनेत्रीने पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

अभिनेत्री रुबिना दिलीक (rubina dilaik) हिने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या खांद्यावर मोठी पट्टी बांधलेली दिसत आहे. यासोबतच तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिला सराव करताना दुखापत झाली आहे. पोस्ट शेअर करताना रुबिनाने लिहिले, “काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात.”

‘झलक दिखला जा’ मध्‍ये रुबीना दिलीकची जोडीदार आणि कोरिओग्राफर सनम जोहर आहे. जी तिचा डान्ससाठी सराव करते. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेत्री उभी राहते आणि डान्स स्टेप समजावून सांगण्यासाठी सनम उडी मारते, परंतु तिला उंचीवरून उडी मारता येत नाही आणि चुकून ती रुबिनाला धडकते, ज्यामुळे अभिनेत्री जमिनीवर पडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

रुबिनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांसोबतच सेलेब्सही नाराज झाल्याचे पाहायला मिळात आहे. एका चाहत्याने आपली प्रतिक्रिया देत लिहिले, “तुमच्या तब्येतीला कोणाची नजर लागली माहित नाही… आधी ‘खतरों के खिलाडी’मध्ये आणि आता ‘झलक दिखला जा’मध्ये कृपया जास्त ताण घेऊ नका, मी तुला या अवस्थेत पाहू शकत नाही, माझी राणी.” त्याचप्रमाणे इतर अनेक युजर्स देखील त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसले.

अलीकडेच झलक दिखला जाच्या निर्मात्यांनी शोच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. शोच्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये रुबिना दिलीक द्रौपदीच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या नृत्यातून तिने महाभारतातील चिरहरनचे दृश्य तयार केले. नृत्यादरम्यान, अभिनेत्रीने सूडाच्या आगीत जळणाऱ्या द्रौपदीचे भयंकर पात्र साकारले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! पॅपाराझींनवर रागवण्याबाबत जया बच्चननं तोडलं मौन, नात नव्याही कारण जाणून थक्क

महानायकांच्या लेकीचा खुलासा! भाऊ अभिषेकबद्दल कुणी तोंडातून ‘अ’ जरी काढला, तरी चढतो पारा

हे देखील वाचा