Thursday, April 10, 2025
Home टेलिव्हिजन असं काय झालं की, ‘बिग बॉस 14’ विनर रुबीनाला द्यावे लागले प्रेग्नंसीवर स्पष्टीकरण; घ्या जाणून

असं काय झालं की, ‘बिग बॉस 14’ विनर रुबीनाला द्यावे लागले प्रेग्नंसीवर स्पष्टीकरण; घ्या जाणून

छोट्या पडद्यावरील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये रुबीना दिलैक हिची गणना होते. रुबीना मागील काही दिवसांपूर्वी ‘झलक दिखला जा 10‘ या शोचा भाग होती. यामुळे ती भलतीच चर्चेत होती. या शोचे 10वे पर्व संपताच रुबीना आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे. सध्या रुबीना दिलैक प्रेग्नंसी याविषयीच्या बातम्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे. मात्र, आता रुबीनाने तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांना पूर्णविराम लावला आहे.

अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) यांच्या लग्नाला चार वर्षे लोटली आहेत. दुसरीकडे, यावर्षी अनेक कलाकारांना आई-वडील बनण्याचे सुख अनुभवले आहे. त्यामुळे रुबीना आणि अभिनवचे चाहतेही त्यांच्या ‘गुडन्यूज’ची वाट पाहत आहेत. या कारणामुळेच रुबीनाच्या प्रेग्नंसीच्या अफवा (Rubina Dilaik On Her Pregnancy News) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

कशा सुरू झाल्या होत्या प्रेग्नंसीच्या अफवा?
झालं असं की, नुकतेच रुबीना तिचा पती अभिनवसोबत एका बिल्डिंगच्या बाहेर स्पॉट झाली होती. या बिल्डिंगमध्ये डॉक्टरांचे क्लिनिकही होते. ते पाहून चाहत्यांना वाटले की, रुबीना प्रेग्नंट आहे आणि ती या बिल्डिंगमध्ये डॉक्टरांकडेच तपासणीसाठी गेली असावी. रुबीनाच्या प्रेग्नंसीच्या अफवा इतक्या पसरल्या की, आता स्वत: अभिनेत्रीनेच स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री रुबीनाने ट्वीट करत लिहिले की, “प्रेग्नंसीबद्दल एक चुकीची धारणा. आम्हाला कोणत्याही कामानिमित्त मीटिंगसाठी जायचे असले, तर नंतर अभिनवसोबत कोणत्याही बिल्डिंगमध्ये जाण्यापूर्वी आम्हाला पाहावे लागेल की, तिथे कोणतेही क्लिनिक तर नाही ना.” रुबीनाच्या या ट्वीटवर अभिनवने माकडाचे इमोजी शेअर करत कमेंट केली आहे.

खरं तर, नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत रुबीनाने तिच्या प्रेग्नंसीवर चर्चा केली होती. ती म्हणाली होती की, सध्या तिला तिच्या आयुष्यात फक्त चांगले काम करायचे आहे.

रुबीनाबद्दल बोलायचं झालं, तर तिने अनेक मालिकांमध्ये आणि रियॅलिटी शोमध्ये काम केले आहे. ती ‘बिग बॉस 14’ची विजेती ठरली होती. यानंतर तिने ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘झलक दिखला जा 10’ या शोमध्ये भाग घेतला होता. तिच्या मालिकांविषयी बोलायचं झालं, तर तिने ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’, ‘छोटी बहू’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (actress rubina dilaik tweet on her pregnancy news she in not pregnant)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अर्रर्र! अरबाज खानने 22 वर्ष लहान प्रेयसीसाेबत केले ब्रेकअप?
कोरिओग्राफर पुनीत पाठकचा खासगी व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओवर उमटताय नेटकऱ्यांचा प्रतिक्रिया

हे देखील वाचा