Friday, March 29, 2024

रुबीना दिलैकने तिच्या गोवा ट्रिपचे बिकिनी फोटो केले शेअर, रिव्हर्स व्हिडिओने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या मालिकांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिचा बोल्ड अवतार तिच्या फॅन्सला दाखवत असते. रुबिनाला सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग असून, नेहमीच तिच्या पोस्ट आणि फोटो व्हायरल होताना दिसतात. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या गोवा ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत.

नुकतीच रुबिना तिच्या पतीसोबत अभिनव शुक्लासोबत गोव्याला सुट्टयांसाठी गेली होती. या सहलीचे अनेक फोटो रुबिनाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या ट्रिप दरम्यान रुबिनाने तिचे मोनोकोनीपासून ते बिकिनीपर्यंत अनेक विविध आऊटफिटमध्ये फोटो क्लिक केले असून, यातले काही फोटो तिने शेअर केले आहेत.

तिने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये ती तिच्या पतीसोबत अभिनव शुक्लासोबत बीचवर व्हॉलीबॉल खेळताना दिसत असून, काही फोटोंमध्ये ती पूलमध्ये डुबकी मारताना दिसत आहे. याशिवाय तिने अजून एक व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडिओ तिने रिव्हर्समध्ये पोस्ट केला असून, ज्यात ती पुलमधून बाहेर येत, डोक्याला फुल लावून, बाथरोब घालून लाऊंज चेयर बसताना दिसत आहे. याशिवाय तिने तिच्या कुटूंबासोबतचे देखील काही फोटो पोस्ट केले आहेत. रुबिनाच्या स्वीमसूटमधल्या फोटोंवर नेटकरी जबरदस्त कमेंट्स करताना दिसत असून, कोणी तिला ‘जलपरी’, कोणी ‘हुस्नपरी’ म्हटले आहे.

रुबिनाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तिने ‘छोटी बहु’ या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पाऊल टाकले. त्यांनतर तिने अनेक हिट मालिकांमध्ये काम केले. लवकरच ती ‘अर्ध’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजपाल यादव, हितेन तेजवानी देखील दिसणार आहे. रुबिनाने बिग बॉस १४ मध्ये सहभाग घेत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली होती. यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

आलियासोबत लग्न करणाऱ्या रणबीरने ‘या’ अभिनेत्रींना केले आहे डेट, एक आहे साऊथमधील सुपरस्टार अभिनेत्री

बिग बॉस ओटीटी फेम गायक मिलिंद गाबाने केला साखरपुडा, व्हिडिओ आणि फोटो झाले व्हायरल

‘जर्सी’ सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कपिल शर्मा शोमध्ये दिसणार शाहिद आणि पंकज कपूर या बापलेकाची जोडी

हे देखील वाचा