Friday, August 1, 2025
Home मराठी जांभळ्या रंगाच्या पैठणीमध्ये खुलले रुपाली भोसलेचे सौंदर्य, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

जांभळ्या रंगाच्या पैठणीमध्ये खुलले रुपाली भोसलेचे सौंदर्य, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री रुपाली भोसले ही तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने नेहमीच चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत आली आहे. अभिनयासोबतच ती तिच्या डान्सने देखील सर्वत्र प्रसिद्ध आहे. रुपाली ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ‘बिग बॉस मराठी २’ नंतर तर तिची लोकप्रियता आणखीनच वाढलेली दिसत आहे. त्यामुळे ती तिच्या चाहत्यांना खुश करण्याची एकही संधी सोडत नाही. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

रुपालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, रुपाली खूपच गोड दिसत आहे. तिने जांभळ्या रंगाची सुंदर अशी पैठणी घातली आहे. यावर तिने लाल रंगाचा डिझायनर ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात सुंदर असा नेकलेस घातला आहे आणि कपाळाला छोटीसी टिकली लावून केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Actress rupali bhosale share her saree look photos on social media)

तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर गौरी कुलकर्णी हिने “अप्रतिम” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

रुपाली भोसलेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बडी दूर से आये है’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘चांदी’, ‘मुक्ती’, ‘जुबान संभाल के’, ‘आजोबा वयात आले’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण बिग बॉसने तिला खूप ओळख निर्माण करून दिली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे ‘संजना’ नावाचे पात्र चांगलेच गाजत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे, तरी देखील तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. या मालिकेत सध्या अनेक वळणं पाहायला मिळत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा