Thursday, July 31, 2025
Home मराठी ‘जस्ट टच’ करत डान्स व्हिडिओ शेअर करून ऋतुजा बागवेने दिल्या मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘जस्ट टच’ करत डान्स व्हिडिओ शेअर करून ऋतुजा बागवेने दिल्या मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत मिताली मयेकर हिचा समावेश होतो. मिताली शनिवारी (११ सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार, तसेच तिचे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच मितालीची मैत्रीण असणाऱ्या अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने एक व्हिडिओ शेअर करून मितालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

ऋतुजाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मिताली सोबतचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋतुजा बागवे, अभिज्ञा भावे आणि मिताली मयेकर दिसत आहेत. त्या तिघी ‘जस्ट टच’ या गाण्यावर ठुमके मारताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मितालीने पांढऱ्या रंगाची टी-शर्ट आणि लाल रंगाचे शॉर्ट्स घातले असून, ऋतुजाने काळ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. तर अभिज्ञाने टी-शर्ट आणि पॅंट परिधान केली आहे. तिघीही या गाण्यावर खूप धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.  (actress rutuja bagwe give best wishesh to mitali mayekar on her birthday)

हा व्हिडिओ शेअर करून तिने ‘हॅप्पी बर्थडे मीतू’ असे लिहिले आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडिओ मितालीने देखील रिपोस्ट केला आहे. मितालीला अनेकजण आज शुभेच्छा देत आहेत. तिचा पती सिद्धार्थ चांदेकरने तिच्यासोबत फोटो शेअर करून “माझ्या सर्वस्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असे कॅप्शन दिले आहे.

https://www.instagram.com/stories/rutuja_bagwe/2659868815861244103/?utm_medium=share_sheet

मितालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तर तिने इरफान खानच्या ‘बिल्लू’ या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यात मिताली इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘उंच माझा झोका’, ‘तू माझा सांगती’ अशा मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. पुढे ‘उर्फी’मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत तिने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. ‘फ्रेशर्स’, ‘आम्ही बेफिकर’, ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच तिने झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत स्मिता तांबे देखील दिसली होती.

मितालीने या वर्षाच्या सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकरशी लग्न केले आहे. सिद्धार्थदेखील एक अभिनेता आहे. तो सध्या ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम करत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा