‘बिग बॉस मराठी १’ फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सई लोकूर होय. सई ही चित्रपटासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो शेअर करत असते. अशातच सईने तिचे शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी हार्ट इमोजीचा वर्षाव करत आहेत.
सईने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा सुंदर असा लाँग ड्रेस घातला आहे. कपाळी काळ्या रंगाची टिकली लावली आहे. तसेच हातात देखील ऑक्साइड बांगड्या आणि अंगठी घातली आहे. तिने या ड्रेसवर काळ्या रंगाची ओढणी घेतली आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Actress sai lokur share her beautiful photo on social media)
हे फोटो शेअर करून तिने केवळ काळ्या रंगाची हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.
सई ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामधील स्पर्धक होती. या शोमध्ये ती फिनालेपर्यंत गेली होती, पण ती हा शो जिंकू शकली नव्हती. त्यानंतर ती खूप चर्चेत आली. या शोने तिला खरी ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना तिची आणि पुष्कर जोगची मैत्री खूप चर्चेत आली होती.
सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘मी आणि तू’, ‘स्माईल प्लिज’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘एकदा पिवळ्या रंगाची साडी घाला, ऋतुराज भाऊ…’, सायली संजीवच्या साडीतील फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट
-‘तुरू तुरू चालू नको’, म्हणत शालूने शेअर केला तिचा अफलातून व्हिडिओ, तिच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष
-डीप नेक ड्रेसमधील मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरचे फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय तिच्या लूकची चर्चा










