Saturday, July 6, 2024

नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर समंथाला ट्रोलर्सने विचारला प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न, अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

दाक्षिणात्य चित्रपटांची अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा नागा चैतन्यपासून घटस्फोट झाल्यापासून ती सतत चर्चेत आहे. एकीकडे तिने ‘द फॅमिली मॅन २’ या वेबसिरीज आणि ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या यशामुळे नवीन शिखरांना स्पर्श केला. दुसरीकडे, नागा चैतन्यसोबतचे तिचे वैवाहिक जीवन तुटल्याने तिचे वैयक्तिक जीवन अशांततेने भरलेले होते. दोघांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चार वर्षांचे लग्न मोडल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

या वाईट टप्प्यातून जाण्यासाठी समंथा (Samantha Ruth Prabhu) सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसली. पण ती सोशल मीडियाच्या ट्रोलिंगपासूनही सुटू शकली नाही. समंथानेही याचा जोरदार सामना केला होता. समंथा एक सक्रिय सोशल मीडिया युजर आहे आणि ती वेळोवेळी तिच्या चाहत्यांसह थेट प्रश्नोत्तर सत्रे करत असते. अशाच एका सत्रादरम्यान एका ट्रोलरने समांथाला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारला. ट्रोलरने विचारले की, “तू आई कधी होणार आहेस.”

समंथाला हा प्रश्न आवडला नाही आणि ट्रोलरला सडेतोड उत्तर देताना तिने तिला तिची खोटी डिलिव्हरीची तारीख सांगितली. ती म्हणाली की, “ज्यांना माझ्या शरीराच्या कार्यामध्ये खूप रस आहे, मी त्यांना सांगते की, माझे बाळ ७ ऑगस्ट २०२२ रोजी ७ वाजता होणार आहे.”

तसे, प्रेग्नेंसीवर समंथा एका मुलाखतीत म्हणाली होती की, “जेव्हा मला मूल होईल, तेव्हा ते माझ्यासाठी संपूर्ण जग असेल. मी काम करणाऱ्या आईंचा खूप आदर करते. माझे बालपण इतके चांगले नव्हते. ज्या लोकांचे बालपण चांगले नाही, त्यांना नेहमीच असे वाटते की, त्यांच्या मुलाला ते सर्व सुख मिळावे जे त्यांना मिळाले नाही. मी एवढ्याच गोष्टीवर अडकून पडते, त्यामुळे मला मूल झाल्यावर मी कुठेच दिसणार नाही, तेच मूल माझ्यासाठी सर्वस्व असेल.”

समंथाने पहिल्यांदा केला आयटम नंबर 

याशिवाय ‘पुष्पा द राइज’ चित्रपटातील गाण्यांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री समंथा प्रभूने ‘ओ अंटा वा मावा’ गाण्यावर परफॉर्म केला. या गाण्यातील अभिनेत्रीच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. हे या चित्रपटाचे हिट गाणे आहे. या गाण्याच्या माध्यमातून समंथा पहिल्यांदाच आयटम नंबर करताना दिसली आहे. त्यासाठी तिने मोठी रक्कमही घेतली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा