×

‘पुष्पा’नंतर समंथा रुथ प्रभूची ‘लायगर’मध्ये एन्ट्री! विजय देवरकोंडासोबत करणार आयटम नंबर

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’मध्ये धमाकेदार आयटम डान्स करणारी समंथा रुथ प्रभू सध्या सतत चर्चेत असते. समंथाचा आयटम डान्स प्रेक्षकांना इतका आवडला आहे की, प्रत्येकजण तिच्याबद्दल बोलत आहे. या  चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी चाहत्यांना वेड लावले आहे. सोशल मीडियावर देखील समंथाच्या आइटम सॉन्गचे अनेक रिल्स व्हायरल होत आहेत. या आयटम डान्सची लोकप्रियता पाहून प्रत्येक निर्मात्याला समंथाला त्यांच्या चित्रपटासाठी साईन करावेसे वाटते. समंथाने त्यांच्या चित्रपटातही आयटम डान्स केला, तर त्यांचा चित्रपट यशस्वी होण्याची शक्यता वाढेल, असे निर्मात्यांना वाटते. माध्यमांतील वृत्तानुसार, विजय देवरकोंडा याच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटासाठी समंथाला संपर्क साधण्यात आला आहे.

तेलुगू मीडियामध्ये नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सध्या आपला संपूर्ण भारतातील ‘लायगर’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. निर्मात्यांना असे वाटते की, चित्रपटात एक आकर्षक डान्स नंबर असावा, जेणेकरून प्रेक्षकांना चित्रपटगृहात डान्स करण्यास भाग पाडले जाईल. या आयटम डान्ससाठी चित्रपटाचे निर्माते अभिनेत्री समंथाला घेण्याचा विचार करत आहेत. या आयटम डान्ससाठी समंथा योग्य पर्याय असेल असे त्यांना वाटते.

समंथाने पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या असून, ‘पुष्पा’ या चित्रपटात तिने तिच्या आयटम डान्सने चाहत्यांना थक्क केले आहे. समंथाला आजकाल अनेक आयटम डान्स ऑफर मिळत आहेत पण ती विचारपूर्वक साइन करत आहे. समंथाने अद्याप ‘लायगर’ निर्मात्यांना हो म्हटले नाही. समंथा सध्या ‘लायगर’च्या निर्मात्यांच्या ऑफरचा विचार करत आहे.

‘लायगर’ या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जगाच्या पटलावर नाव कमावणाऱ्या मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या बॉक्सरची ही कथा असेल. ‘लायगर’ या चित्रपटात बॉक्सर माइक टायसनचा खास कॅमिओ देखील दिसणार आहे.

हेही वाचा :

 

 

Latest Post