Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा ‘मी अजून मरत नाहीये’, आजाराशी झुंजणारी समंथा यशाेदा चित्रपटाचं करतेय प्रमाेशन

‘मी अजून मरत नाहीये’, आजाराशी झुंजणारी समंथा यशाेदा चित्रपटाचं करतेय प्रमाेशन

साऊथ प्रिसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे काहीदिवसांपासून तिच्या आजारपणामुळे आणि ‘यशोदा‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ऑटोइम्यून आजाराशी लढा देत असलेली समंथा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. समंथा उपचारांतून वेळ काढून चित्रपटाचे प्रमाेशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमाेशन दरम्यान समंथा असे काही बाेली की, ती चांगलीच चर्चेत आली आहे.

‘यशोदा’च्या प्रमोशनदरम्यान समंथा (samantha ruth prabhu) माध्यमाशी बाेलताना म्हणाली की, “व्यक्तीच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दोन्ही दिवस येतात. काही दिवस तिला तिच्या आजारपणामुळे अंथरुणावरुन उठणे कठीण झाले होते. मात्र, आता काही दिवस तिला याच्याशी लढायचे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

अभिनेत्रीने मुलाखतीत पुढे सांगितले की, “काही दिवसात मला जाणवले की, आता उठनेही कठीण आहे. पण जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा मला पूर्ण धक्का बसला की, समंथा तू खूप काही केलं आहे आणि तू इथे लढायला आली आहे.” ‘हा आजार जीवघेणी आहे’ असा दावा करणाऱ्या माध्यमांच्या एका विभागाचे वृत्तही सामंथाने फेटाळून लावले. यावर अभिनेत्री म्हणाली की, “आता तीन महिने झाले आहेत आणि मी लवकरच मरणार नाही.” त्या लेखांचा संदर्भ देत, अभिनेत्री म्हणाली की, “ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे आणि त्यासाठी वेळ लागतो. गेले तीन महिने माझ्यासाठी खूप वाईट गेले. मी खूप जास्त प्रमाणात औषधे घेत आहे आणि डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

अभिनेत्री पुढे म्हणाली की, “मला वाटते की, मी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल बोलली आहे.” अभिनेत्रीने सांगितले की, “लोकांना हे समजले पाहिजे की, प्रत्येकाचा चांगला काळ असतो आणि प्रत्येकाचा वाईट काळही असतो. तुम्ही श्रीमंत किंवा प्रसिद्ध आहात याने काही फरक पडत नाही.”

समंथाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘शाकुंतलम’ आणि बॉलिवूडमध्येही पदार्पण करताना दिसणार आहे. (actress samantha ruth prabhu speaks on her health condition amid yashoda film promotional event)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिना अन् विकीच्या लग्नात झाले हाेते जाेरदार भांडणं, अभिनेत्रीनं केला खुलासा

लखनऊमध्ये प्रियांकाचा का होतोय विरोध? पोस्टर लावून विरोधक म्हणाले,’नवाबांच्या शहरात…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा