साउथ इंडस्ट्रीतील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) हिची लोकप्रियता हिंदी प्रेक्षकांमध्येही कमी नाही. तिच्या लूकपासून ते चित्रपटांपर्यंत ती खूप चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून समंथा तिच्या ‘यशोदा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. जबरदस्त टीझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक ‘यशोदा’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपवत संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणाऱ्या या बहुभाषिक चित्रपटाच्या ट्रेलरची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी समंथा ‘यशोदा’ चित्रपटात गर्भवती महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. समंथाने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अत्यंत वेगळी भूमिका ती यशोदामध्ये साकारणार आहे. पुष्पा या चित्रपटात तिने पहिल्यांदाच आयटम साँग केला होता. ऊ अंटावा हे गाणं आजही तुफान लोकप्रिय आहे. याशिवाय ‘फॅमिली मॅन 2’ या वेब सीरिजमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयकौशल्याची झलक दाखवली. आता यशोदाच्या माध्यमातून समंथा पुन्हा एकदा तिची प्रतिभा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. ‘यशोदा’ हा समंथाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरेल, असे मानले जात आहे.
यशोदा कौन है पता है ना?? ????
Unveiling the fiercest, emotional & Action-packed #YashodaTrailer on 27th Oct @ 5.36 PM????#YashodaTheMovie @Samanthaprabhu2 @varusarath5 @Iamunnimukundan @harishankaroffi @hareeshnarayan #Manisharma @krishnasivalenk @SrideviMovieOff @SanchitaTrivedi pic.twitter.com/pE71VFif95
— Sridevi Movies (@SrideviMovieOff) October 24, 2022
या दिवशी ट्रेलर रिलीज होणार
समंथा रुथ प्रभूने तिच्या इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली आहे आणि ‘यशोदा’च्या ट्रेलर रिलीजची तारीख आणि वेळेबद्दल माहिती दिली आहे. ‘यशोदा’ या चित्रपटाचा ट्रेलर 27 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 5:36 वाजता प्रदर्शित होईल.
समंथा रुथ प्रभूचा ‘यशोदा’ हा चित्रपट, एका महिला कैद्याच्या जगण्याची कथा, मूळतः तेलुगुमध्ये चित्रित करण्यात आली होती. हरी आणि हरीश दिग्दर्शित या चित्रपटात समंथा रुथ प्रभू, वरलक्ष्मी सरथकुमार, राव रमेश, उन्नी मुकुंदन, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, दिव्या श्रीपाद, प्रियांका शर्मा आणि कल्पिका गणेश यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘यशोदा’ 11 नोव्हेंबर 2022 रोजी तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
असा असतो किंग खानचा विकेंड, सगळं काही चांगलं करूनही खावा लागतो पत्नीचा ओरडा
कसं पकडलं गौरीनं शाहरुख अन् प्रियांकाचं लफडं? एका क्लिकवर घ्या जाणून