मीनाक्षी शेषाद्री, संगीत बिजलानी आठवतायत? ‘जुर्म’ सिनेमाच्या ३० वर्षांनंतर कुठे आहेत या दोन देखण्या अभिनेत्री?


विनोद खन्ना, मीनाक्षी शेषाद्री आणि संगीता बिजलानी अभिनित ‘जुर्म’ या सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाले.
सलीम खान लिखित, महेश भट्ट दिग्दर्शित आणि मुकेश भट्ट निर्मित या क्राईम थ्रिलर सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोबतच चित्रपट समीक्षकांनीही या सिनेमाचे कौतुक केले होते.

विनोद खन्ना, मीनाक्षी शेषाद्री आणि संगीता बिजलानी या तिघांच्याही करियर मधला सर्वात मोठा चित्रपट म्हणून ‘जुर्म’ सिनेमा ओळखला जातो. मीनाक्षी शेषाद्रि आणि संगीता बिजलानी या दोघींना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेयर पुरस्कारांसाठी नामांकन देखील मिळाले होते.

आज तब्बल ३० वर्षानंतर या दोन्ही अभिनेत्रींमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. या लेखात आपण या दोघींच्या सध्याच्या आयुष्याबद्दल काही माहिती बघणार आहोत.

संगीता बिजलानी :

गीता साराभाई नावाची व्यक्तिरेखा संगीताने साकारली होती. गीता ही एका खुनाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असते. तिच्या संरक्षणासाठी पोलीस इन्स्पेक्टर शेखर वर्मा तिच्यासोबत असतो. यातच त्या दोघांचे अफेयर चालू होते. असा एकंदरीत संगीताचा रोल होता.

आता संगीता चित्रपटांपासून काहीशी दूर असली तरी अनेक पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये ती दिसत असते. संगीता नेहमीच तिच्या कामापेक्षा खाजगी आयुष्याबद्दल चर्चेत राहिली. सलमान सोबत असणारे तिचे नाते किंवा मोहम्मद अज़हरुद्दीन सोबतचे तुटलेले लग्न या आणि अशा अनेक कारणांमुळे ती चर्चेत असायची. काहीच महिन्यांपूर्वी तिने तिचा ६० वा वाढदिवस साजरा केला.

मीनाक्षी शेषाद्री :

अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून मीनाक्षी ओळखली जाते. या सिनेमात मीनाक्षीने विनोद खन्नाच्या पत्नीची मीना वर्माची भूमिका साकारली होती. मीनाक्षीने ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भरपूर लोकप्रियता मिळवली. मीनाक्षीने त्यावेळच्या सर्वच अभिनेत्यांसोबत काम केले होते. मीनाक्षीने सध्या चित्रपटामधून ब्रेक घेतला असून ती सध्या अमेरिकेत तिच्या परिवारासोबत राहत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.