अभिनेत्री सान्या मल्होत्रा ‘या’ चित्रपटात साकारणार महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका, फर्स्ट लूक आला समोर

अभिनेत्री सान्या मल्होत्रा (sanya malhotra) सध्या सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटातील भूमिकेने चर्चेत आहे. आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करणारा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पोलिस अधिकार्‍याची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. कोणता आहे तो नवीन चित्रपट चला जाणून घेऊ.

‘लव्ह हॉस्टेल’ या चित्रपटानंतर सान्या मल्होत्रा ​​आणखी एका चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. तिने तिच्या आगामी चित्रपटाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वर्दी घातल्याचे दिसत आहे. सान्याचा हा पोलीस लूक तिला खुपच शोभतो आहे. नेटफ्लिक्सवरील या आगामी चित्रपटात ती एका मजेदार पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचे दिसते. तसेच सान्या एका केसबद्दल बोलताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये सान्या म्हणते, “एसपी साहेब म्हणतात की, आम्ही हे प्रकरण कबुतराच्या आतड्यांप्रमाणे गोंधळात टाकले आहे. पण त्यांना कोणी समजवायचे की, आम्ही स्वतः या प्रकरणात फडफडत आहोत.” यानंतर, सान्याच्या व्हिडिओमध्ये एक पोस्टर दिसत आहे, ज्यावर बेपत्ताच्या शोधात असे लिहिले आहे. त्याचबरोबर सान्याने या व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये “बेपत्ता खुनी व्यक्तीचा शोध सुरू आहे. तुम्ही त्याला पाहिले आहे का? आम्ही त्याला शोधण्यासाठी येत आहोत, इन्स्पेक्टर महिमा कथल,” असे लिहले आहे. तिच्या या व्हिडिओवरून हे स्पष्ट झाले आहे की सान्या मल्होत्रा ​​तिचा नवीन चित्रपट घेऊन येत आहे ज्यामध्ये ती पोलीस अधिकारी बनली आहे. त्याचा लूक पाहून यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर अनेकांनी “हॅलो इन्स्पेक्टर मॅडम” असे म्हणत तिच्या या नव्या भूमिकेचे कौतुक केले आहे. ‘कथाला’ असे या चित्रपटाचे नाव असून तो नेटफ्लिक्सवर येणार आहे.

दरम्यान याआधी सान्या मल्होत्रा ​​’लव्ह हॉस्टेल’मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सोबत विक्रांत मॅसी आणि बॉबी देओल होते. तिच्या मागील चित्रपटाच्या यशानंतर सान्या मल्होत्रा ​​लवकरच नेटफ्लिक्सच्या कथाला चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे, जो लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

Latest Post