Monday, July 1, 2024

निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

कलाकारांच्या आयुष्याला ट्रोलिंग आणि अफवा या पूजलेल्याच आहेत. कलाकारांनी एखाद्या मुद्द्यावर आपले मत मांडले की, त्यांना ट्रोल केले जाते. अशात हे सर्व, तर कलाकार सहन करतात. परंतु त्यांच्या विषयी न घडलेल्या गोष्टींची अफवा पसरवल्यास ते सहनशक्तीच्या बाहेरचे असते. कलाकारांना त्यांच्या आयुष्यात अशाही भयानक अफवांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित होतो. अशाच वाईट अफवांना सपना चौधरीने तोंड दिले आहे.

हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरीविषयी काही दिवसांपूर्वी एक अफवा पसरवली गेली होती. या अफवेने, तर हद्दच पार केली. एका गायिकेचा मृत्यू झाला होता, पण अनेकांनी सपना चौधरीलाच मृत घोषित केले. सपनाचा हरियाणामधील एका रस्त्यावर अपघात झाला आणि ती मृत्यू पावली, अशी ही अफवा होती. या अफवेमुळे तिला खूप मानसिक त्रास झाला. अनेक ठिकाणांहून तिला चाहत्यांचे आणि नातेवाईकांचे फोन येऊ लागले होते. हा संपूर्ण प्रकार फार निंदनीय होता. सर्वजण या अफवेमुळे घाबरले होते. परंतु लवकरच या विषयी खुलासा झाला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. (Actress sapna Choudhary react to her death rumour says her family got upset)

एका मुलाखतीमध्ये डान्सरने यावर आपली प्रतिक्रिया दिली, सपना म्हणाली की, “जशी माझ्या निधनाची अफवा पसरली, तसे मला सगळीकडून नातेवाईकांचे फोन येऊ लागले. ही बाब माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी खूप वेदनादायी होती. माझ्या कुटुंबीयांना हे सर्व कसे सावरायचे हे समजतच नव्हते. या क्षेत्रामध्ये आम्हाला वेगवेगळ्या अफवांना सामोरे जावे लागते, पण ती अफवा फार विचित्र होती. मला हे समजत नाही की, कोणतीही शहानिशा न करता लोक अशा अफवा कसे काय पसरवतात, ज्याचे परिणाम त्या व्यक्तीलाच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांना देखील भोगावे लागतात.”

सपनाने पुढे तिच्या कुटुंबीयांची काळजी व्यक्त करत सांगितले की, “जरा विचार करा कुणाच्या आई- वडिलांना त्यांची मुलगी जिवंत आहे की नाही असा फोन येतो, तेव्हा त्यांना कसे वाटत असेल. एका गायिकेचा मृत्यू झाला होता. परंतु सर्वांना ती गायिका मी आहे असे वाटले. ज्या गायिकेचा मृत्यू झाला आहे, तिच्याविषयी मला दुःख आहे. पण जर अशी अफवा पसरली नसती, तर बरे झाले असते.”

सपनाने तिच्या कारकिर्दीमध्ये खूप मेहनत घेतली आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. तिच्या निधनाच्या अफवेने त्यांना देखील मोठा धक्का बसला होता. साल २०१७ मध्ये ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वामध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. उत्तम डान्ससह ती दमदार अभिनय देखील करते. ‘नानू की जणू’, ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ अशा चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

-अरबाजने अनिल यांना विचारला सलमानच्या लग्नाचा प्रश्न; अभिनेते म्हणाले, ‘तू तर त्याचा भाऊ आहेस…’

-आमिर खानच्या बॉडीगार्डचा पगार ऐकाल, तर मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा पगार नक्कीच विसराल

हे देखील वाचा