Tuesday, July 9, 2024

एकदम कडक! विना मेकअप सपनाने केला ‘असा’ इशारा, काही सेकंदातच पाहायला मिळाला झक्कास लूक

हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी सपना चौधरी फक्त आता हरियाणापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. सपनाचा वावर हा प्रचंड मोठा झाला आहे. म्हणजेच सपनाच्या नावाचा डंका हा संपूर्ण जगात गाजतोय. आपल्या डान्समुळे तर ती चर्चेत होतीच, परंतु जेव्हा ती छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये गेली, तेव्हा तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. सपना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नेहमीच ती तिचे फोटो आणि डान्स व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती आधी विना मेकअप दिसते आणि इशारा करते. त्यानंतर तिचे वेगळेच रूप पाहायला मिळते.

सपनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती विना मेकअप दिसत आहे. हा व्हिडिओ अपलोड करताच व्हायरल होत आहे. व्हिडिओत सपना इशारा करताना दिसत आहे. ती आपल्या बोटांनी पाठीमागे इशारा करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सपनाने एक भन्नाट कॅप्शनही दिले आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सपनाने लिहिले की, “जरा वाट पाहा माझ्या मित्रांनो. धिंगाणा आणि मजा दोन्ही करू.”

यासोबतच सपनाने देसीक्वीन, सपनाचौधरी, पॉझिटिव्हवाईब्स यांसारखे काही हॅशटॅग्जचाही वापर केला आहे. सपनाच्या या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज आणि १ लाखापेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. याव्यतिरिक्त नेटकऱ्यांनी ६०० पेक्षा अधिक कमेंट्सचाही पाऊस पाडला आहे. (Actress Sapna Choudhary Without Makeup Look Doing This Signal Video Goes Viral)

व्हिडिओत सपना दिसतेय खूपच सुंदर
व्हिडिओमध्ये सपना खूपच सुंदर दिसत आहे. तिने लेहंगा परिधान केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सपना काही सेकंदांसाठी विना मेकअप दिसत आहे, तर पुढे ती मेकअपमध्ये एकदम झक्कास दिसत आहे. व्हिडिओमध्ये ‘कट्टो गिलहरी’ हे गाणे वाजतानाही ऐकू येत आहे, ज्यावर सपना नाचत आहे.

‘बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षाही सुंदर दिसतेय’
सपना चौधरीच्या या व्हिडिओवर कमेंट्स करत चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षाही खूप सुंदर दिसत आहेस. विना मेकअपही गोड दिसतेय.” आणखी एक चाहता कमेंट करत “लाजवाब” असे म्हणाला.

त्याचबरोबर इतर चाहतेही व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजींचा वर्षाव करत आहेत.

हे देखील वाचा