या आठवड्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘अतरंगी रे’ (atrangi re) या चित्रपटातील ‘चका चक’ हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. एआर रहमानच्या या रचनेवर केवळ चाहतेच इंस्टा रील डान्स करताना दिसत नाहीयेत. तर विकी कौशल आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) सारखे सेलिब्रिटीही या गाण्यावर डान्स करण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीयेत. सध्या सोशल मीडियावर सारा आणि अनन्या पांडे यांचा एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही सुंदर अभिनेत्री ‘चका चक’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर ‘चका चक’ डान्स व्हायरल
साराने तिचा नवीन व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा आणि अनन्याचा शानदार डान्स पाहून चाहत्यांचे भान हरपत आहे. एका पुरस्कार सोहळ्याच्या एका छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये, सारा आणि अनन्या ‘चका चक’ गाण्याची स्टेप करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहिले की, “चका चक गर्ल्स, ठुमका आणि ट्वर्ल्स, प्रिय अनन्या पांडे हे खूप लवकर शिकली.” या व्हिडिओमध्ये सारा आणि अनन्याची जबरदस्त डान्सिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे आणि दोन्ही अभिनेत्री सुंदर दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, अनन्याने काळ्या रंगाचा लाँग स्कर्ट आणि काळ्या रंगाची मॅचिंग ब्रालेट घातली आहे. सारा देखील अतिशय सुंदर एथनिक लूकमध्ये दिसत आहे. साराने हलक्या रंगाचा फ्लोरल लेहेंगा परिधान केला आहे. दोघीही आपल्या डान्स आणि सौंदर्याने चाहत्यांचे भान हिरावून घेत आहेत.
‘अतरंगी रे’ हा सारासाठी खूप खास चित्रपट आहे. या चित्रपटात सारा रिंकू या बिहारी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सारा एका पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे, ज्यामध्ये पती आणि प्रियकर यांच्यातील निवडीची कोंडी दाखवण्यात येणार आहे. साराच्या या लेटेस्ट डान्स व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दोघांच्या चाहत्यांच्या अतिशय क्यूट आणि प्रेमळ प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ”दोघी खूप सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहेत,” तर दुसऱ्याने कमेंट बॉक्सवर लिहिले, “ब्युटीफूल स्वीटहार्ट्स, जबरदस्त केमिस्ट्री.” चाहते या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनेक वर्षांपूर्वीच झाली होती ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’ची भविष्यवाणी! व्हायरल होतोय चित्रपटाचा पोस्टर










