Friday, March 29, 2024

Bigg Boss 15: प्रतीक सहजपालवर भडकली तेजस्वी प्रकाश; म्हणाली, ‘सांगू का, टास्कमध्ये तुझे हात कुठे कुठे लागतात?’

‘बिग बॉस १५’च्या सुरुवातीपासून घर दोन गटात विभागले गेले आहे. एकीकडे करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश आणि उमर रियाझ एका टीममध्ये खेळत आहेत, तर दुसरीकडे प्रतीक सहजपाल त्यांच्या विरोधात दिसत आहे. सुरुवातीला प्रतीकला घरातील सदस्यांसोबत नातेसंबंध बनवणे खूप कठीण जात होते. परंतु आता त्याचा खेळ केवळ प्रेक्षकांनाच नाही, तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांना देखील आवडला आहे. घरात बहुतेक भांडणे करण्याचा आरोप प्रतीकवर असतानाच, आता त्याच्यावर मुलींशी गैरवर्तन केल्याचाही आरोप लावला जात आहे.

तेजस्वी प्रकाश मध्ये घेऊन आली जुना मुद्दा
प्राईझ मनीच्या टास्क दरम्यान, करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल यांच्यात पुन्हा एकदा भांडण झाले. टास्क दरम्यान करणने त्याला लाथ मारली, असे प्रतीकने सांगितले. तर करणही लाथ चुकून लागल्याच्या मुद्द्यावर ठाम राहिला. पण प्रतीक करणचे ऐकायला तयार नव्हता आणि त्याने करणची शाळा घेतली. यादरम्यान भांडणात करणला साथ देत, तेजस्वी असे काही म्हणाली की, जे ऐकून सगळेच थक्क झाले. (bigg boss 15 tejasswi prakash accused pratik sehajpal to touching girl inappropriately

तेजस्वीने लावले गंभीर आरोप
करण आणि प्रतीकच्या भांडणात उडी घेत तेजस्वी म्हणाली, की “तुला सांगू का टास्क दरम्यान तू काय करतोस?” ज्याला प्रतीक म्हणाला, “तू बोल.” त्यानंतर तेजस्वी प्रतीकला म्हणाली की, “टास्क दरम्यान मुलींना चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो आणि हे सर्व कॅमेऱ्यात आहे.” मात्र तेव्हा रश्मीने तेजस्वीला शांत केले.

तेजस्वीच्या ‘या’ वक्तव्यावर भडकले घरवाले
तेजस्वीने प्रतीकवर असे आरोप लावल्यामुळे, घरातील सर्व सदस्य तिच्या विरोधात गेले. प्रतीकसोबत भांडण करत असलेला तिचा मित्र उमर रियाझनेही या प्रकरणी प्रतीकला पाठिंबा देत जुन्या गोष्टींना अशाप्रकारे मध्ये आणणे अजिबात योग्य नसल्याचे सांगितले. त्याचवेळी या प्रकरणावर निशांतही तेजस्वीवर चांगलाच चिडला.

मायशा अय्यरचा काढला विषय
खरं तर , तेजस्वीने तेव्हाचा मुद्दा काढला, जेव्हा मायशा अय्यर घरात होती. सुरुवातीला मायशा अय्यरने प्रतीकवर आरोप केला होता की, ती कपडे बदलत असताना प्रतीक त्या एरियामध्ये आला होता. याचे स्पष्टीकरण देत प्रतीक म्हणाला होता की, तो भांडण करत तिथपर्यंत आला होता आणि जाणूनबुजून काहीही केले नाही. तेजस्वीने तीच गोष्ट पुन्हा समोर आणली, जे घरच्यांना अजिबात आवडले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा