बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. साराने रविवारी (२३ जानेवारी) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ती मेकअप करत आहे आणि अचानक बल्ब फुटतो आणि ती घाबरते.
सारा (sara ali khan) शूटच्या तयारीसाठी तिचा मेकअप करून घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. इतकंच नाही, तर ‘जितूकडून नारळाचे-पाणी माग” असं ती म्हणताना ऐकू येते. यानंतर, तिचा मेकअप कलाकार टच-अप संपवून निघून जात असताना, एक मोठा आवाज ऐकू येतो ज्यामुळे सारा अली खान घाबरते. त्यानंतर लगेचच व्हिडिओ थांबतो.
साराने या व्हिडिओला “मॉर्निंग लाईक दिस,” असे कॅप्शनसह शेअर केले. यासोबतच तिने इमोजीही बनवले. हा अनुभव सारासाठी भयानक असल्याचे या इमोजींवरून स्पष्ट झाले. साराने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मेकअप आर्टिस्ट आदित्य शर्मा आणि निर्माती पूजा विजान यांनाही टॅग केले आहे. विकी कौशलसोबत लक्ष्मण उतेकरच्या आगामी चित्रपटासाठी सारा सध्या इंदोरमध्ये आहे.
सारा गेल्या काही आठवड्यांपासून इंदोरमध्ये शूटिंग करत आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन अभिनित ‘लुका छुपी’चा सिक्वेल असल्याचे म्हटले जात आहे. परंतु अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. सारा नुकतीच शुटिंगमधून ब्रेक घेत असताना आई अमृता सिंगसोबत उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेली होती. तिने गेल्या वीकेंडमधील तिच्या ट्रिपचे फोटोही शेअर केले आहेत.
सारा अली खानने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत दिसला होता. यानंतर तिने ‘लव्ह आज कल’ आणि ‘सिम्बा’मध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. ती लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी’मध्ये दिसणार आहे. सारा ‘कुली नंबर १’मध्ये वरुण धवन सोबत दिसली होती.
हेही वाचा :
- ‘गुम है किसी प्यार में’ फेम यश पंडितने गर्लफ्रेंड महिमा मिश्राशी केले लग्न, पाहा लग्नाआधीच्या सोहळ्यापासून लग्नापर्यंतचे फोटो
- रणवीर सिंग नाहीतर बॉलिवूडचा ‘सिंघम’ होता ‘बाजीराव मस्तानी’साठी निर्मात्याची पहिली आवड, पुढे झाले असे की…
- काय सांगता! दारू पिण्यासाठी गोविंदाने घेतली होती आईची परवानगी, वाचा हिरो नं १ चा भन्नाट किस्सा