×

काय सांगता! दारू पिण्यासाठी गोविंदाने घेतली होती आईची परवानगी, वाचा हिरो नं १ चा भन्नाट किस्सा

बॉलिवूडमधील हिरो नंबर वन अभिनेता कोण असा प्रश्न जर कोणाला विचारला तर प्रत्येकाचे उत्तर एकच येईल आणि ते म्हणजे वन अँड ओन्ली गोविंदा. ९० चे संपूर्ण दशक गाजवणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. गोविंदाने कॉमेडी, ऍक्शन, रोमँटिक, ड्रामा आदी जवळपास सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी सहज साकारल्या. आज जरी गोविंदा चित्रपटांमध्ये कमी दिसत असला तरी त्याची क्रेझ जराही कमी झालेली नाही. आज आम्ही तुम्हाला गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मजेशीर गोष्ट सांगणार आहोत. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांची प्रेमकहाणी खूपच खास आणि रंजक आहे. एकमेकांसाठी परफेक्ट कपल असणाऱ्या या जोडीचा एक धमाल किस्सा सध्या सोशल मीडियावर खूपच गाजत आहे.

गोविंदा आणि सुनीता हे इंडस्ट्रीमधील पावर कपल आहे. एका मुलाखतीमध्ये सुनीताने सांगितले होते की, “आम्ही दोघे एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहोत. मी पूर्णपणे मॉडर्न आणि गोविंदा पूर्ण धार्मिक. तरीही आमचे लग्न झाले आणि आम्ही ते निभावले सुद्धा.” पुढे सुनीता म्हणाली, “गोविंदा इतका साधा होता की माझ्यासारख्या मॉडर्न मुलीला डेटवर नेताना त्याने त्याच्या आईला दारू पिण्यासाठी परवानगी मागितली होती. पुढे गोविंदाने हा किस्सा सर्वांना सांगितला.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

गोविंदा सुनीताला घेऊन ताज हॉटेलमध्ये गेला होता. तो हॉटेलमध्ये गेला तेव्हा तो खूपच भावुक झाला होता, कारण याच हॉटेलमध्ये त्याला सुरुवातीला नोकरी नाकारण्यात आली होती. पुढे गोविंदा आणि सुनीताने या हॉटेलमध्ये जेवण केले, भरपूर डान्स केला आणि मग शेवटी शॅम्पेनची बाटली उघडली पण तेव्हाच त्याने त्याच्या आईला फोन केला आणि विचारले की मी शॅम्पेन पिऊ का? यावर त्याची आई त्याला म्हणाली, “तसे पाहिले तर ते वाईट आहे, मात्र एन्जॉय करता आहात तर करा.” तेव्हा सुनीता म्हणाली, “झाले का आईला विचारून? चल आता एन्जॉय करू” त्या पार्टीचा हँगओव्हर एक आठवडाभर राहिला असे गोविंदाने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

गोविंदा आणि सुनीताच्या लग्नाला ३६ वर्ष पूर्ण झाली असून, त्यांना टीना आणि यशवर्धन अशी दोन मुलं आहेत. सुनीता आणि गोविंदा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि अनेकदा ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना देखील दिसतात.

हेही वाचा :

Latest Post