Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड विकी भाई लग्न कधी करणार आहे? या प्रश्नावर सारा अली खानने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

विकी भाई लग्न कधी करणार आहे? या प्रश्नावर सारा अली खानने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबरमध्ये लग्न करणार असून, माध्यमांतील वृत्तासनुसार, ते राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत. अलीकडेच विकी कौशल आणि सारा अली खान यांना पॅपराजींनी स्पॉट केले होते. यादरम्यान विकी कौशलला विचारण्यात आले की, तू लग्न कधी करणार आहेस. आता या प्रश्नाला उत्तर देताना विकी गप्प राहिला पण सारा अली खान हसली.

सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये सारा आणि विकी कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. यादरम्यान विकीला प्रश्न विचारण्यात आला की, “विकी भाई लग्न कधी?” हे ऐकून सारा हसायला लागली. तिचे हे हसू खूप काही बोलून गेले. मात्र, या वृत्तांवर कॅटरिना आणि विकीच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, विकी आणि कॅटरिना यांनी दिग्दर्शक कबीर खानच्या घरी गुपचुप रोका केला आहेत. मात्र, असे काहीही घडले नसल्याचे त्यांच्या टीमने म्हटले आहे. त्याचवेळी, माध्यमांतील वृत्तानुसार विश्वास ठेवला, तर विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाची तयारी गुप्तपणे केली जात आहे. अशा प्रश्नांची उत्तरे तो का देत नाही, याचे उत्तर विकीने नुकतेच दिले आहे. विकी म्हणाला, “मी खरे सांगू, तर माझ्याकडे ती मेंटल स्पेस नव्हती कारण मी शूटिंगच्या मध्यभागी होतो.” दुसरीकडे, कॅटरिनाला विचारण्यात आले की, ती विकी कौशलशी कधी लग्न करणार आहे, ज्यावर तिने सांगितले की, हा एक प्रश्न आहे जो तिला १५ वर्षांपासून विचारला जात आहे.

एका वृत्तानुसार, अलीकडेच विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ मुंबईतील जुहू भागात एक अपार्टमेंट पाहिले आहे. त्यासाठी ते मोठी रक्कम मोजणार आहेत. या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाल्यानंतर हे भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे शेजारी बनतील.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाची त्याच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. हे जोडपे लग्नानंतर जुहू येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होईल. हे घर घेण्यासाठी विकी कौशलने मोठी रक्कम भरल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकीने जुहूच्या पॅलेसमधील एका अतिशय आलिशान इमारतीत ६० महिन्यांसाठी म्हणजेच ५ वर्षांसाठी एक अपार्टमेंट भाड्याने घेतला आहे. त्यांनी जुलै २०२१ मध्ये ८ व्या मजल्यावरील अपार्टमेंट भाड्याने घेतले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा