Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड काय ती साडी, काय ती अदा! सारा अली खानच्या ट्रान्सपरेंट साडीतील फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

काय ती साडी, काय ती अदा! सारा अली खानच्या ट्रान्सपरेंट साडीतील फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

चार वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री सारा अली खान खूप कमी काळात नावारुपाला आली आहे. साराचे आई-वडील म्हणजेच सैफ अली खान आणि अमृता सिंग बॉलिवूडमध्ये दिग्गज कलाकार आहेत. मात्र, तिने त्यांच्या नावाचा फायदा न घेता स्वत:च्या हिमतीवर आपले नाव कमावले. मोजक्याच सिनेमात काम करून साराने तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. ती तिच्या सिनेमांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियामार्फत चाहत्यांसोबत शेअर करते. मात्र, आता तिच्या काही फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सारा अली खान (Sara Ali Khan) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती साडी परिधान केलेली दिसत आहे. विशेष म्हणजे, तिने परिधान केलेली ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा याने डिझाइन केली आहे. फोटोमध्ये सारा मिश्र रंगाच्या साडीत पोझ देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) 

साराने शेअर केलेल्या तिच्या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. फोटोंना आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, २ हजारांहून अधिक कमेंट्सही या फोटोला मिळाल्या आहेत.

साराने शेअर केला मजेशीर व्हिडिओ
साराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर (Sara Ali Khan Instagram) एक मजेशीर व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत ती प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर दिसत आहे. यात तो गेटवर उभा राहून हॉटेलात जागा असण्याबाबत विचारत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) 

सारा अली खान हिचे आगामी सिनेमे
सारा अली खान हिच्या आगामी कामाबाबत बोलायचं झालं, तर ती लवकरच आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या सिनेमात अभिनेता विकी कौशल याच्यासोबत दिसणार आहे. हा सिनेमा महाभारतातील योद्धा अश्वत्थामावर आधारित असेल. या सिनेमाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत आहेत. या सिनेमामार्फत सारा आणि विकी पहिल्यांदाच एकमेकांसोबत मोठ्या पडद्यावर काम करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा