Friday, July 5, 2024

‘आपण अशा जगात राहतो…;’म्हणत, सरगुनने पुरुषप्रधान इंडस्ट्रीबद्दल केला मोठा खुलासा

पंजाब इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहता हिने आपल्या दमदार अभिनयाने ताहत्यांच्या मनामध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. तिने पंजाबमध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता मात्र, या अभिनेत्रीने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोबत ‘कटपुतली’ या चित्रपटामधून बॉलिवीडमध्ये पदार्पण केले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहता (Sargun Mehta) हिने नुकतंच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. अभिनेत्री आणि निर्माती सरगुन सतत चर्चेत असते. छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यार्यत पोहोचण्यचा खूप चांगला अनुभव अभिनेत्रीने घेतला आहे. तिने नुकतंच दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) याच्यासोबत ‘बेबी भांगडा पौंडे’ गाण्यामध्ये झळकली होती. त्यासोबतच तिने ‘कटपुतली’ चित्रपटातही काम केले असून, तिने पुरुषप्रधान इंडस्ट्रीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री सरगुन हिने इंडस्ट्रीमध्ये पुरुषांसोबत काम करत असताना तिला किती स्ट्रगल करावा लागला यावर बेधडक खुलासा केला. तिने नुकतंच दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “एक महिला म्हणून त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणे जिथे पुरुषांच्या नियामानुसार चालावा लागते तिथे काम करणे खूपच कठीण असतं. कधी कधी तुम्हाला हलक्यामध्ये घेतले जातं. पण मी प्रयत्न करत असते की, या गोष्टीला वेगळ्या रुपाने घेऊ शकेल. जेव्हा त्यांना वाटते की, मला काहीच माहीती नाही आणि माझी समजूत काढून मला शांत बसवतील, पण त्यांना माहीत नाही की, मला त्यांच्यापेक्षा जास्त माहित आहे. मी पुर्ण तयारीने जात असते, जे त्यांना आश्चर्यचकित करुण ठेवतं. त्यांना वाटतंय की, ते मला राइडवर घेऊन जाऊ शकतात,पण असं नाही. मी त्यांना नकळत माझ्या बुद्धीने मात देत असते.”

सरगुनने पुढे सांगितले की, “तुम्हाला जो तुमचा कच्चा दुवा वाटत असेल त्याला तुम्ही तुमची ताकद बनवा, म्हणून जेव्हा कोणतीही व्यक्ती तुम्हाला हलक्यात घेत असेल, तर त्याला त्याची चव दाखवा.” तिने पुढे सांगितले, “पुरुष अभिनेत्यासाठीही वस्तू समान असतात. तिने सांगितले की, वेगळ्या मार्गाने असू शकते पण त्यांना वाटेत आव्हानांचाही सामना करावा लागतो. याचे कारण म्हणजे आपण अशा जगात राहतो जिथे लोक आपल्याला जिंकताना पाहू शकत नाहीत.”

अभिनेत्री सांगते की, “जेव्हा लोक सल्ला देत असतात तेव्हा मी माझे कान बंद करते, हा मुर्खपणा वाटतो पण, पण हेच खरं आहे. मी सल्ला कसा घेते हे खूपच वेगळं आहे. मी अशी मुलगी आहे जिने काम करतानाच खूप काही शिकले आहे. मी एका अभिनेत्रीची भूमिका करत असताना खूप प्रश्न विचारत असते. मी गेल्या पाच वर्षापासून मी माझे मत मांडत आहे की, याला कशाप्रकारे करु शकेल. जेव्हा मी माझा निर्मित केलेला चित्रपट पाहते, तेव्हा त्यामध्ये काय चुकीचे आहे आणि मी काय चांगले केले आहे, तेव्हा मी प्रश्न विचारते. मला असा सल्ला नाही आवडत जो मला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरत नाही.”

तिने पुरुषप्रधान इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो आणि आपण त्यावर कशाप्रकारे मात देऊ शकतो हे साध्या भाषेत सरगुनने सांगितले आहे . सरगुन नेहमी आपल्या कामामुळे ओळखली जोते, तिचा स्वत:च्या कामावर खूप विश्वस आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुष्का शर्मा पुर्वी ‘या’ अभिनेत्रीला विराट कोहलीने केले होते डेट, जाणून घ्या एका क्लीकवर
बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी मुंबईला ठोकला राम रमा , विदेशात थाटलाय…

हे देखील वाचा