Sunday, May 19, 2024

‘या’ अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी चक्क स्त्रीचे सौंदर्य खुलवणाऱ्या केसांनाच केले होते बाय- बाय?

बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ता सोमवारी (9 ऑक्टोबर) आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने आगळ्या वेगळ्या भूमिका बजावून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सयानी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवीधर आहे. ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे अभिनेत्रीला ओळख मिळाली. या वेबसीरिजमध्ये सयानीने दामिनी रिझवी रॉयची भूमिका साकारली आहे.

सयानीने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘सेकंड मॅरेज डॉट कॉम’ या चित्रपटातून केली होती. यानंतर तिने ‘मार्गरीटा विद ए स्ट्रॉ’ या चित्रपटात काम केले. सयानीने या चित्रपटात पाकिस्तानी-बांगलादेशी मुलीची भूमिका साकारली होती. सयानीने शाहरुख खानसोबत ‘फॅन’मध्ये काम केले आहे. त्याचबरोबर सयानीने अक्षय कुमारसोबत ‘जॉली एलएलबी 2’, आयुष्मान खुरानासोबत ‘आर्टिकल 15’ सारख्या चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवला आहे.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण करणारी सयानी लग्नाला खूप घाबरते. माध्यमांशी बोलताना सयानीने सांगितले होते की, लग्नात मिळणाऱ्या फसवणुकीची खूप भीती वाटते. सयानी म्हणाली होती की, “जर मला माझ्या आयुष्यात फसवणुकीसारख्या समस्येचा सामना करावा लागला, तर कदाचित मी ते करू शकणार नाही. हे वेदनादायक असेल. मी लग्न न करण्याचं हेच कारण आहे.”

सयानी गुप्ताने एकदा तिच्या केसांना बाय-बाय म्हटले होते, त्यानंतर तिचे फोटो खूप व्हायरल झाले होते. सुंदर सयानीचे हे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र, सयानीने तिचे केस काढले नव्हते. तिच्या एका प्रोजेक्टसाठी, प्रोस्थेटिक्स मेकअप तंत्रांच्या मदतीने हा लूक तयार केला गेला होता.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली सयानी आपल्या फोटो आणि व्हिडिओद्वारे चाहत्यांना स्वत:बद्दल अपडेट देत राहते. त्याचबरोबर ती आपल्या चित्रपट कारकिर्दीची माहिती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत राहते. सयानीचे सध्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुमारे 7 लाख फॉलोअर्स आहेत. आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपट करणारी सयानी मॉडर्न किंवा ट्रॅडिशनल कोणत्याही प्रकारच्या ड्रेसमध्ये प्रचंड सुंदर दिसते.

सयानी अलीकडेच ‘काली पीली टेल्स’ मध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये ६ कथा आहेत. मुंबई शहरातील प्रेम आणि नातेसंबंधातील गुंतागुंत या कथांद्वारे उत्तम प्रकारे चित्रित करण्यात आले आहे.


हेही वाचा-
इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरुप परतली मायदेशी; म्हणाली, ‘मला थोडा वेळ…’
‘माझी आई एकटीच घर चालवते’ सावत्र वडिलांना टोमणा मारत पलक तिवारीने घेतली आई श्वेताची बाजू

हे देखील वाचा