Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड Bigg Boss OTT: शमिता शेट्टीला येतेय राज कुंद्राची आठवण; आईला म्हणाली, ‘जिजू कसे आहेत?’

Bigg Boss OTT: शमिता शेट्टीला येतेय राज कुंद्राची आठवण; आईला म्हणाली, ‘जिजू कसे आहेत?’

टीव्ही वरील सर्वात वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या ‘बिग बॉस ओटीटी’चे पर्व अखेरच्या टप्प्यामध्ये येऊन पोहचले आहे. यामध्ये आता फक्त ५ स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. अशात सध्या सर्व स्पर्धकांच्या कुटुंबियांशी भेटीगाठी सुरु आहेत. अनेकांना ‘बिग बॉस ओटीटी’चे पर्व राज कुंद्राची मेहुणी शमिता शेट्टीच जिंकणार असे वाटत आहे. शमिताला बिग बॉसच्या घरामध्ये पाहून अनेकांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती. परंतु त्यानंतर तिने पार पाडलेले टास्क आणि घरातील तिचा असलेला वावर पाहता, तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिताच्या कुटुंबियांमधील एक सदस्य तिला भेटायला आले होते.

शमिताला भेटायला तिची आई आली होती. एवढ्या दिवसांनंतर आईला पाहून ती खूप भावुक झाली. तसेच आईच्या आणि कुटुंबाच्या विरहामुळे तिला अश्रू अनावर झाले. तिने आपल्या आईशी भावुक होऊन बरीच बातचीत केली. तिने आपली बहीण शिल्पा शेट्टीसह जिजाजी राज कुंद्राची देखील चौकशी केली. शमिता म्हणाली की, “कसे आहेत ती आणि जिजाजी?” तिच्या या प्रश्नाला उत्तर देत सुनंदा म्हणाल्या की, “सर्व काही ठीक आहे. ती पण बरी आहे. तुझी खुप आठवण येते तिला. मला आणि तुझ्या बहिणीला तुझ्यावर खूप अभिमान आहे. विनयने तुझ्यासाठी प्रेमळ शुभेच्छा पाठवल्या आहेत. तू खूप ताकतवर आहेस. आपल्या कुटुंबात तीन महिला आहेत आणि त्या खरोखरच मजबूत आहेत. मला असं वाटतं की, हे असेच रहावे. चढ- उत्तर, हे तर आयुष्यातीलच एक भाग आहे.” 9Shamita Shetty is worried about his jiju raj Kundra ask about him this question)

काही दिवसांपूर्वीच शमिताची बहीण शिल्पाने तिला प्रोत्साहन देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये शिल्पाने शमिताचे बिग बॉसच्या घरातील काही फोटो शेअर केले होते. तसेच आपल्या चाहत्यांना शमिताला मत देण्यासाठी सांगितले. हा व्हिडिओ पोस्ट करत शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझी टुनकी टॉप ५ मध्ये आहे. मला या वेळी तिच्यावर खूप अभिमान वाटतं आहे. बिग बॉसच्या घरातील तिचा प्रामाणिकपणा आणि तिची प्रतिष्ठा पाहून मी खूप आनंदी आहे. तू पहिल्यापासूनच माझ्यासाठी जिंकलेली आहेस शमिता. तुम्ही सर्व देखील तिला बिग बॉसची विजेता बनवाल अशी मी आशा बाळगते. शमिता शेट्टीला मत देण्यासाठी माझ्या इंस्टाग्राम स्टोरीवर जा.”

 

अशा पद्धतीने शिल्पाने आपल्या चाहत्यांना आव्हान केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर

-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा