‘बिग बॉस ओटीटी’चे पर्व आता लवकरच संपणार आहे. या घरामध्ये आजवर अनेक वेगवेगळ्या कारणावरून वाद विवाद झाले. अशात टास्क खेळताना आणि एवढे दिवस एकत्र राहून घट्ट मैत्री असलेल्यांमध्ये देखील शत्रुत्व आले, तर वैर असलेल्यांमध्ये घट्ट मैत्री झाली. सर्वात वादग्रस्त मानल्या जाणाऱ्या या शोमध्ये आता फक्त काही दिवस सदस्यांना बिग बॉसच्या घरात रहावे लागणार आहे. खूप कमी काळ उरल्याने सर्वच सदस्य प्रेक्षकांना खुश ठेवण्याची आणि त्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. दर वर्षी प्रमाणे यंदाही पत्रकारांना बिग बॉसच्या बॉसच्या घरात येऊन तेथील सदस्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांचे प्रश्न स्पर्धकांपर्यंत नीट पोहचले.
यामध्ये घरातील सर्व सदस्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी टास्क पूर्ण करताना केलेल्या चुका, त्यांनी केलेली वक्तव्ये या सर्वांवर पत्रकारांनी बिग बॉसच्या घरातील सदस्यांची चांगलीच हजेरी घेतली. सर्वात पहिले पत्रकारांनी शमिता शेट्टीला घेरले. त्यांनी शमिताला फेमिनीज्मवरून प्रश्न विचारले. काही दिवसांपूर्वी मूस जट्टानाने दिव्यावर आरोप केला होता की, ती सर्वांवर चान्स मारत फिरत असते. मूसने केलेल्या आरोपांवर शमिता शांत राहिली होती. तिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे तिच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित करत पत्रकारांनी तिला विचारले की, “जेव्हा दिव्या नेहाच्या विरोधात असे बोलत होती तेव्हा, तर तू फेमिनिज्मला पाठिंबा दिला. पण, जेव्हा मूसने दिव्याबद्दल असे शब्द वापरले तेव्हा तुझ्यामधील फेमिनिज्म कुठे गेला होता?” (Actress Shamita stuck for discrimination on feminism apologizes for not supporting Divya agrawal in big boss OTT)
यावर उत्तर देत शमिता म्हणाली की,”मूसच्या भांडणांमध्ये कोणीच लक्ष देत नाही. कारण तिच्या भांडणांमध्ये पडले की, तिचे वेगळेच रूप पाहायला मिळते. मला वाईट वाटत आहे की, मी दिव्याला त्यावेळी साथ नाही देऊ शकले. त्यावेळी माझ्या मनामध्ये दिव्या विषयी सहानुभुती होती.”
शमितानंतर पत्रकारांनी दिव्या अग्रवालवर देखील निशाणा साधला. तसेच त्यांनी नेहा भसीनचा ‘गंदी चड्डी’ वाला मुद्दा समोर आणला. त्यावेळी नेहाने निशांतवर प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाली, “जेव्हा पत्रकार या विषयी प्रश्न विचारत होते तेव्हा तू हसत होतास. सर्वांसाठी हे खूप विचित्र होते.” याचवेळी दिव्या नेहाला येऊन म्हणाली होती की, “दुसऱ्यांच्या चड्डीवर बोलताय, ते ठीक आहे.”
दरवर्षी पत्रकार जसे बिग बॉसच्या घरामध्ये येतात तसे तेथील सदस्यांचे नातेवाईक देखील त्यांना भेटायला येत असतात. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देखील त्यांचे नातेवाईक आले होते. यामध्ये दिव्याचा बॉयफ्रेंड वरुन सूद, नेहा भसीनची बहीण राशी भसीन, प्रतीकची बहीण प्रेरणा, राकेशची भाची ईशा आणि शमिता शेट्टीची आई सुनंदा शेट्टी पाहुणे म्हणून आल्या होत्या. आपल्या कुटुंबियांना भेटून सर्वजण आनंदी होते. एवढेदिवस सगळ्यांपासून लांब असल्याने काहींना अश्रू अनावर झाले.
शेवटच्या अंतिम फेरीमध्ये सध्या बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी, नेहा भसीन, प्रतीक सेहजपाल, दिव्या अग्रवाल आणि निशांत भट्ट सहभागी आहेत. खूप कमी सदस्य घरामध्ये राहिल्याने हा शो आणखीनच रंजक होऊ लागला आहे. दररोज पुढे नवीन कोणते वळण मिळणार, कोण राहणार कोण जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खास मित्रासह अंडरवॉटर मजा करताना दिसली ‘सोनू’; बिकिनी लूकने तर सर्वांनाच केलंय चकित
-ट्रेंडिंग गाण्यावर ‘स्वीटू’नेही धरला ताल, गोड अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा