Monday, July 8, 2024

लोकांच्या घरात झाडू मारण्याचे काम करणाऱ्या शशिकला, नकारात्मक भूमिका साकारून बनल्या आघाडीच्या अभिनेत्री

सिने जगतात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चित्रपट जगतात काम करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. या कलाकारांच्या यादीत जेष्ठ अभिनेत्री शशिकला  यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या चित्रपटातील अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या शशिकला यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली. ज्यामुळे त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. त्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून आल्या होत्या, मात्र नियतीच्या मनात त्यांच्याबद्दल  काही वेगळेच होते. जाणून घेऊ या त्यांच्या याच संघर्षाबद्दल. 

शशिकला (Shashikala)यांचा जन्म अतिशय श्रीमंत कुटुंबात झाला होता. शशिकला यांचे वडील मोठे उद्योगपती होते, त्यामुळे त्यांचे बालपण पूर्ण आरामात गेले. मात्र, नशिबाने साथ सोडली आणि शशिकला यांचे वडील रस्त्यावर आले. शशिकला यांच्या वडिलांची व्यवसायात फसवणूक झाल्याचे बोलले जाते. व्यवसाय कोलमडल्यानंतर शशिकला यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत आले. इथून शशिकला यांचा खरा संघर्ष सुरू झाला, त्यांना घर चालवण्यासाठी लोकांची घरं झाडण्याचं काम करावं लागलं.

बातम्यांनुसार, शशिकला यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांनी एका नाटक मंडळात प्रवेश घेतला. या काळात त्यांच्यातील कला बघून लोक प्रोत्साहित करायला लागले. ‘तू सुंदर आहेस आणि तू चित्रपटांसाठी प्रयत्न कर’, असे लोक त्यांना सांगू लागले. नूरजहाँने शशिकला यांना झीनत या चित्रपटातून पहिली संधी दिली. या चित्रपटात शशिकला यांना छोट्या भूमिकेची ऑफर आली होती.मात्र, शशिकला यांनी हिरोईनऐवजी ‘व्हॅम्प’ म्हणजेच निगेटिव्ह कॅरेक्टर साकारून अधिक प्रसिद्धी मिळवली.

शशिकला यांनी त्यांच्या चित्रपट प्रवासात जवळपास 100 चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या. शशिकला यांचे वैयक्तिक आयुष्यही खूप वादग्रस्त होते. विवाहित असूनही शशिकला एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्या आणि घर सोडून परदेशात गेल्या. मात्र, या व्यक्तीची फसवणूक झाल्यानंतर त्या भारतात परत आल्या आणि जवळपास नऊ वर्षे मदर तेरेसा यांच्यासोबत येथे राहिली.

अधिक वाचा- 
चाहत्यांनी पाठवलेली पत्र पाहून संकर्षण कऱ्हाडे झाला भावूक; म्हणाला “या सगळ्यांन…”
काय सांगता! सिद्धार्थ चांदेकरने केले तब्बल 16 किलो वजन कमी; टीप्स सांगत म्हणाला, ‘शरीराविषयी आदर…’

 

हे देखील वाचा